पुन्हा एकदा सुरक्षादलांवर हल्ला ; २ सैनिक हुतात्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2020
Total Views |

Jammu Kahsmir_1 &nbs
 
जम्मू काश्मीर : जम्मू काश्मिरातील श्रीनगर शहरात गुरुवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले आहेत. शहरातील एचएमटी भागामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सलग पेट्रोलिंग पार्टीवर फायरिंग केली.
 
 
दुसरीकडे, पाकिस्तानने पुन्हा एकदा लाइन ऑफ कंट्रोलवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पुंछ परिसरात एलओसीवर पाकिस्तान सतत फायरिंग करत आहेत. चार दिवसांपूर्वीच पुंछच्या देगवार, माल्टी आणि दल्लान परिसरात पाकिस्तानने फायरिंग केली होती. गुरुवारी झालेल्या हल्ल्याच्या ७ दिवसांपूर्वी नगरोटामध्ये सैन्य आणइ सुरक्षादलाने जैशच्या ४ दहशतवाद्यांना ठार केले होते.
 
 
जम्मू-कश्मीर पोलिसांनी सांगितले की, हे दहशतवादी निवडणुकांपूर्वी मोठा हल्ला करण्याचा कट रचत आहेत. पाकिस्तानमध्ये बसलेला मसूद अजहरचा भाऊ रऊफ लाला यांचा हँडलर होता. यापूर्वीही ८ नोव्हेंबरला कुपवाडामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. सैन्य आणि बॉर्डर सिक्योरिटी फोर्सने जॉइंट ऑपरेशनमध्ये 3 दहशतवाद्यांना ठार केले होते. चकमकीमध्ये सैन्याच्या कॅप्टनसह 3 जवानही शहीद झाले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@