महिलांसाठी रेल्वे लोकल सुरू पण सुरक्षेचं काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2020
Total Views |

Mumbai Local_1  
 
 

आधी महिलेला वाचवले त्यानंतर दागिने मोबाईल लुटले

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ महिला प्रवाशांसाठी मुंबई लोकल सुरू करण्यात आली असली तरीही अजून प्रवासी महिलांच्या सुरक्षेचं काय हा मुद्दा जैसे थे आहे. मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेला, असा धक्कादायक अनुभव आला. सोनसाखळी चोरापासून वाचवणाऱ्या तरूणीचे संरक्षण करणाराच दगाबाज निघाल्याचा प्रकार घडला आहे.
 
 
 
मंगळवार दि. २४ नोव्हेंबर रोजी पश्चिम रेल्वेच्या कांदिवली स्थानकात आपल्या भावाला भेटण्यासाठी बोरिवलीहून ११ वाजून ४४ मिनिटांनी संबंधित तरुणी निघाली होती. केवळ एका स्थानकाच्या दरम्यान हा प्रकार घडला. ती जनरल डब्यात चढली होती. संपूर्ण डबा रिकामा होता. रहिम शेख नावाचा ३२ वर्षीय तरूण डब्यात झोपला होता.
 
 
 
पोलिसांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली स्थानकातून ट्रेन सुटण्यापूर्वी तरुण लोकलमध्ये चढला. ओमप्रकाश दिक्षित, असे या तरुणाचे नाव होते. ओमप्रकाशने डब्यात घुसताच तरुणीच्या गळ्यावर चाकू ठेवला. तिच्या अंगावरील सोन्याचा हार, मोबाईल मागून घेतला. तरुणीने घाबरून रडायला सुरुवात केली. रहीम शेखने दिक्षितने तिच्याशी दोन हात केले. डब्यातून हाकलून दिले. “तु मला बहिणीसारखी आहेस. तुला कोणताही धोका नाही’, असा धीर दिला.
 
 
 
बोरिवली स्थानकातून सुटल्यावर रहिमने दिक्षितला पुन्हा हाक मारून डब्यात बोलावून घेतले. बोरिवली ते कांदिवली स्थानकादरम्यान रहीमने तरुणीशी वाईट वर्तणूक केली. तिचे दागिने आणि मोबाईल लुटले. हा प्रकार घडत असतानाच तरूणीने चैन खेचली. कांदिवली स्थानक आल्यानंतर दोघेही डब्यातून उतरुन पसार झाले. स्थानिक रेल्वे पोलीसांनी चपळाई दाखवत लगेचच दिक्षितला पकडले. बोरिवली रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांनी याबद्दल माहिती दिली.
 
 
 
सीसीटीव्हीच्या आधारे आवळल्या मुसक्या
 
 
“सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांच्या आधारे एक स्केच तयार करण्यात आले. त्यानंतर पोलीस दलाच्या विविध तुकड्या कांदिवली आणि आसपासच्या परिसरात पाठवण्यात आल्या. रहीम शेख हा अंमली पदार्थांचे सेवन करणारा तरूण असल्याचे समजले. कांदिवलीतील झोपडपट्टीत सार्वजनिक स्वच्छतागृहात कामे करत असल्याचीही माहिती मिळाली. या शोधमोहिम त्याला अटक करण्यात आली. रहीम शेख व दिक्षित एकमेकांना ओळखत नसल्याचे उघड झाले आहे. तरूणीला वाचवण्याचं रहीमने केवळ नाटक केलं होतं. त्यानंतर तिला लुटण्यासाठी हा बनाव रचला.


@@AUTHORINFO_V1@@