मुंबई : राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांनी वीजबिल आंदोलन दरवाढीसाठी ठिय्या मांडला असताना आता राज ठाकरे यांनीही सरकारविरोधात दोन हात केले आहेत. सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहून सर्वसामान्य जनतेला बिले भरू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, दुपारच्या सुमारास ठाण्यात विजबिलाविरोधात आंदोलन करताना मनसे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले.
अविनाश जाधव यांना अटक
या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलन करताना कुठल्याही प्रकारची तोडफोड करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. मनसे कार्यकर्त्यांच्या अटकेचे सत्र ठाण्यात सुरू झाले. अहमदनगरमध्येही आंदोलना दरम्यान तोडफोड करण्यात आली. ठाण्यात पोलीसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाल्याने जाधव यांच्यावर कारवाई झाली आहे. यानंतर राज्यभरात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक आदी ठिकाणी तीव्र आंदोलने सुरू आहेत. या घटनेचे पडसाद राज्य भर उमटत आहेत.
कायदा सुव्यवस्थेचा ठेका मनसेने घेतलेला नाही !
कोरोना, लॉकडाऊन आणि कायदा सुव्यवस्था या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांची धरपडक सुरू करण्यात आली आहे. याला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला इशारा दिला आहे. इतके दिवस आंदोलन न करता शांतपणे आवाहन मनसे करत होती. उर्जा मंत्र्यांनी या काळात वीजबिल कमी का केले नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. तर कायदा सुव्यवस्था पाळण्याचा ठेका फक्त आम्हीच घेतला आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला.
राज ठाकरेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
मनसेच्या अथक पाठपुराव्यानंतर वाढीव वीज बिलांमध्ये सवलत देऊ असं सरकारतर्फे घोषित करण्यात आलं होतं. पण अचानक सरकारने घुमजाव केला आणि सरकार बळजबरीची भाषा बोलू लागलं. म्हणूनच ज्या प्रशासनामार्फत भविष्यात सरकार कारवाई करेल त्यांच्यामार्फतच सरकारला इशारा देत आहोत, असे पत्र राज ठाकरे यांनी लिहीले आहे. सरकारला आर्जवाची भाषा समजत नाही, त्यामुळे आंदोलनाची वेळ आलेली आहे. उगीच संघर्ष वाढवू नये, असा इशारा त्यांनी पत्राद्वारे दिला आहे.