चिन्यांचे विचारदर्शन आणि वास्तव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2020   
Total Views |

China_1  H x W:
 
 
 
कोरोना काळाच्या निमित्ताने चीनचे जे रूप जगाने पाहिले ते खरेच विश्वासास पात्र आहे का? तिबेट, हाँगकाँग, तैवान, नेपाळ, पाकिस्तान, या देशांसोबत चीनचे जे संबंध आहेत, ते संबंध ताओच्या दर्शनानुसार विश्वासास पात्र आहेत का? ‘मोहिस्ट’ तर्कशास्त्र मानणारेही चीनमध्ये बहुसंख्य आजही आहेत. ‘मोहिस्ट’ दर्शनाने ताओच्या दर्शनशास्त्रावर प्रश्न निर्माण केले. एका राष्ट्राची दुसऱ्या राष्ट्रावर विजय-पराजयाची संकल्पना बाद केली, ‘मोहिस्ट’ दर्शनानुसार युद्ध आणि अतिक्रमण हे निषिद्ध आहे, हिंसा करू नये, प्रेम आणि अहिंसा हे जीवनाचे तत्त्व आहे.
 
 
चीनबाबत सध्या दोन घटना चर्चेत आहेत. एक घटना नेपाळमधली आहे. नेपाळ काँग्रेसचे नेता जीवन बहादुर शाही, जे नेपाळचे विरोधी पक्षनेताही आहेत, त्यांनी चीनच्या नेपाळमधील छुप्या विस्तारवादावर आणि नेपाळच्या सीमावर्ती भागातील हमला परिसरातील आक्रमणावर भाष्य केले. यावर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी या विधानाला खोटे ठरविले. मात्र, त्याचवेळी नेपाळमधील चिनी दूतावासाने नेपाळ काँग्रेसला या भाष्याबद्दल जाब विचारणारे पत्र पाठविले, यामध्ये जीवन बहादुर शाही यांना धमकाविलेही आहे. आंतरराष्ट्रीय राजकीय नियमानुसार हे गैरच आहे. पण, नेपाळचे पंतप्रधान यावर गप्प आहेत. कारण चीनचे भय, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या बैंग जिओ नावाच्या पत्रकाराने चीनच्या खानपान संस्कृतीवर चित्रण केले. यामध्ये चिनी कसे मुंगीपासून झुरळापर्यंत सगळे खातात, ते कसे काहीही खातात, असे लिहिले. यावर लोकांनी चीनच्या खानपान संस्कृतीबद्दल भरभरून मते व्यक्त केली. जी चिनी खानपानविरोधातच होती. आता या पत्रकाराला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. इतकेच नव्हे, तर त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ‘तुझ्या आई आणि बहिणीवर बलात्कार करू,’ असे सारखे संदेश येत आहेत. हे संदेश ऑस्ट्रेलियामध्येच राहणाऱ्या राष्ट्रवादी चिन्यांकडून येत आहेत, तसेच चीनमधूनही येत आहेत. या दोन घटनांना पाहून वाटते की, चीनची सामाजिक आणि राजकीय संस्कृती काय असावी? चिनी म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर काय येते? ‘हिंदी-चिनी भाई भाई’ म्हणत, भारतावर युद्ध लादणारे विश्वासघातकी? चिनी माणसांनी ‘राष्ट्र’ म्हणून त्यांची प्रतिमा विश्वासघातकीच बनविली. मोठ्या-मोठ्या राष्ट्रांचे सोडा; पण आपल्या गल्लीबोळातही ‘चिनी माल - नो गॅरंटी,’ असे समीकरण जुळलेले आहे. या विश्वासघातकी समीकरणावर चीन पोसलेला आणि माजलेला आहे.
 
 
तसे पाहिले तर चीनचे हे स्वरूप आज जे आहे, ते पूर्वीही तसेच असेल का? या गोष्टीचा मागोवा घेतला तर जाणवते की, चीनच्या पारंपरिक कथांमध्ये, लोकगाथांमध्ये दया, करुणा, माणुसकी दिव्यत्व वगैरेच सांगितलेले आहे. चीनचे महत्त्वाचे तीन दर्शन, तर्कशास्त्र आहेत. ‘कन्फ्युशियस’, ‘ताओ’ आणि ‘मोहिस्ट.’ या तिन्ही दर्शनविचारांनी चिनी समाजजीवनावर मोठा परिणाम केला. पण, आता असे वाटते की, चीनने त्यांचेच दर्शनशास्त्र मोडीत काढले. ‘कन्फ्युशियस’ यांचे विचार होते की, वाईट माणूस कधीही चांगला शासक बनू शकत नाही, मग तो कितीही शक्तिवान असू दे, चांगुलपणा हा माणसाचा निसर्गदत्त गुण आहे. हा गुण त्याला ईश्वराकडून मिळालेला आहे. त्यामुळे चांगले न वागणे ही ईश्वराची अवज्ञा आहे. सध्याच्या चीनच्या वैचारिकतेला पाहिले, तर चीन आणि चांगुलपणा यांचा दुरान्वयेही संबंध दिसत नाही. तसेच या दार्शनिकाने म्हटले की, वाईट माणूस चांगला शासक बनू शकत नाही, तर चीनचे सत्ताधारी आज जगाशी ज्या पद्धतीने वागत आहेत, त्यावरून जगातली कुणीही व्यक्ती सांगेल की, चीनचे सत्ताधारी चांगले आहेत की काय? दुसरे दार्शनिक लाओ-त्से; अर्थात ताओ. ताओंचे म्हणणे होते की, दुसऱ्यावर विजय मिळविण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवा, म्हणजे ताकदवान बनाल, तसेच ज्याचा कुणावरही विश्वास नसतो, त्याच्यावरही कुणाचा विश्वास नसतो. कोरोना काळाच्या निमित्ताने चीनचे जे रूप जगाने पाहिले ते खरेच विश्वासास पात्र आहे का? तिबेट, हाँगकाँग, तैवान, नेपाळ, पाकिस्तान, या देशांसोबत चीनचे जे संबंध आहेत, ते संबंध ताओच्या दर्शनानुसार विश्वासास पात्र आहेत का? ‘मोहिस्ट’ तर्कशास्त्र मानणारेही चीनमध्ये बहुसंख्य आजही आहेत. ‘मोहिस्ट’ दर्शनाने ताओच्या दर्शनशास्त्रावर प्रश्न निर्माण केले. एका राष्ट्राची दुसऱ्या राष्ट्रावर विजय-पराजयाची संकल्पना बाद केली, ‘मोहिस्ट’ दर्शनानुसार युद्ध आणि अतिक्रमण हे निषिद्ध आहे, हिंसा करू नये, प्रेम आणि अहिंसा हे जीवनाचे तत्त्व आहे. आता जर खरेच ‘मोहिस्ट’ दर्शन चीनमध्ये सर्वमान्य आहे, असे गृहित धरले, तर मग चीनची राजसत्ता आज ज्याप्रकारे अतिविस्तारवादी आणि दडपशाहीचे कुटील कारस्थान करते, ते कोणते दर्शन म्हणावे? थोडक्यात, चीनच्या दर्शनशास्त्र आणि संस्कृती विचारांचा आणि चीनच्या राज्यशास्त्र वर्तनाचा दुरान्वयेही ताळमेळ नाही.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@