आनंदवन वादाच्या भोवऱ्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2020
Total Views |

sheetal_1  H x

 
 
 
शीत आमटे यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या आरोपांशी आमटे कुटुंबीय असहमत


मुंबई: थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या महत्वकांक्षेतून साकारलेले आनंदवन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. समाजातील निराधार आणि वंचितांसाठी आनंदवन कायम मोलाचे कार्य करत आले आहे. बाबा आमटेंचा हाच वारसा घेऊन संपूर्ण आमटे कुटुंबीय या समाजकार्यात सक्रीय झाले. परंतु आता आनंदवनातले अंतर्गत वाद शीतल आमटे-करजगी यांनी थेट समाजमाध्यामांवर उघड केले आहेत.

 

महारोगी सेवा समितीच्या कार्यकारी अध्यक्षा डॉ.शीतल आमटे यांनी आमटे कुटुंबीयांमधील वाद, त्यांच्यावर केली जाणारी मनमानी व छळ या सगळ्या मुद्द्यांवरून कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांवर आरोप केले. पण आमटे कुटुंबीयांनी २२ नोव्हेंबर रोजी एक निवेदन प्रसिद्ध करत सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. ज्यामध्ये त्यांनी शीतल आमटेंनी केलेले आरोप तथ्यहीन आहेत असे म्हणत आपली असहमती जाहीर केली. तसेच ह्यापुढे महारोगी सेवा समितीचे काम योग्य पद्धतीने होईल असा विश्वाशी व्यक्त केला.

 

शीतल आमटे या पेशाने डॉक्टर असून आनंदवनाच्या सगळ्याच कामात आजवर त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. परंतु काही काळापूर्वी समितीच्या पदावरून त्यांना काढून टाकण्यात आले होते आणि त्यामुळे त्या प्रचंड अस्वस्थ आणि मानसिक तणावाखाली होत्या, असे निवेदनात म्हटले आहे. शीतल आमटे त्यांच्या समाजमाध्यमांवरील खात्यांवर सतत सक्रीय असतात. त्यांची मानसिक स्थिती दर्शवणारे विचार त्या नेहमी लिहित असतात. आनंदवनातल्या ह्या वादाविषयी त्यांनी ह्यापूर्वीच त्यांच्या ट्विटर खात्यावर लिहिले होते. आणि ‘एक स्त्री सर्व समिती सदस्यांचे नेतृत्व करते हे अनेकांना पचत नाहीये’ अशा परखड शब्दात आपली नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. परंतु ह्या वादावर अधिक स्पष्ट उत्तरे द्यायला कोणीच तयार नाही, असे चित्र समोर येत आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@