'आपला मुख्यमंत्री, आपलं दुर्दैव..आपलंच नशीब' : मनसे

    23-Nov-2020
Total Views |

mns_1  H x W: 0



मुंबई
: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल कोरोनासंदर्भात जनतेला संबोधित केले. मुख्यमंत्री या भाषणात वाढीव वीजबिले व इतर प्रश्नांवर जनतेला दिलासा देतील अशी अपेक्षा होती. मात्र याच अपेक्षाभंगावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाविकास आघाडी सरकार  व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले.





'मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही. आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी', असे ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे. मागील काही दिवसांपासून वाढीव बिलांबाबतीत राज्य सरकारने नागरिकांना दिलासा द्यावा यासाठी भाजपसह मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून मनेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती. पण अजूनही वाढीव वीजबिलाचा मुद्दा ऐरणीवर आहे, असंही काल संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या संबोधनात कोरोनाची दुसरी लाट, कार्तिकी वारी आणि पोस्ट कोविडच्या परिणाम यांसह विविध विषयांवर आपलं मत मांडलं. याशिवाय, कोरोना काळ अजून संपलेला नाही याची जाणीव करुन देत 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या राज्य सरकारच्या उपक्रमाचीही आठवण करुन दिली. हाच धागा पकडून संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. आपला मुख्यमंत्री आपले दुर्दैव असून ती आता आपलीच जबाबदारी असल्याचं सांगत देशपांडे यांनी घणाघात केला आहे.