हे बेईमानीनं आलेलं सरकार आहे - देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2020
Total Views |

devendra fadanvis_1 


औरंगाबाद : सध्या राज्यात सर्वत्र पदवीधर मतदारसंघ निवडणुकांचे वारे वाहत आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या यंदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांनासुद्धा अभ्यासपूर्ण उत्तरं दिली.

 

'भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी स्वतः ६ वर्षांपूर्वी शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली होती' असंही ते म्हणाले. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या अकाली निधनानंतर कार्यकर्ते निवडणुकीच्या मनस्थितीत नव्हते. ज्यामुळे ६४ हजार मतं मिळूनही शिरीष बोराळकरांना पराभव पत्करावा लागला होता. परंतु ह्या वेळच्या निवडणुकीत मात्र सर्व सुशिक्षित आणि सुजाण पदवीधर भाजपला मोठ्या संख्येने मतं देतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

याशिवाय मराठवाड्यातील इतर विद्यमान आमदारांविषयी व विद्यमान सरकारविषयी जनतेमध्ये प्रचंड नाराजी असल्याचेही फडणवीस ह्यावेळी म्हणाले. मुळात हे सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही तर बेईमानीनं आलेलं आहे असं स्पष्ट मत व्यक्त करत सरकारच्या इतर धोरणांवरही त्यांनी ताशेरे ओढले.

 
@@AUTHORINFO_V1@@