‘एनसीबी’ अधिकाऱ्यांवर हल्ला : ड्रग्ज माफीयांना पाठीशी कोण घालतंय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2020
Total Views |

Samir Wankhede_1 &nb 
 
 
मुंबई : बॉलीवूडमधील ड्रग्स कनेक्शन प्रकरणामध्ये अनेक मोठमोठ्या चेहऱ्यांची नावे समोर येत आहेत. अभिनेता सुशांतसिंग आत्महत्ये प्रकरणी चौकशी करताना बॉलीवूडमधील ड्रग्सचे पसरलेले जाळे समोर आले. यावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अनेक कारवाया केल्या. यादरम्यान नुकतेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या ६ जणांच्या टीमवर काही अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. गोरेगावमध्ये ही घटना घडली असल्याची माहिती देण्यात येत आहे. तसेच, यावरून आता 'ड्रग्स माफियांना कोण पाठीशी घालत आहे?' असा सवाल विरोधी पक्षांकडून केला आहे.
 
 
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकावर जवळपास ६० जणांनी हल्ला चढवल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या हल्ल्यात पथकातील दोन अधिकारी जखमी झाले. एनसीबीचे अधिकारी कॅरी मॅंडिस या ड्रग तस्कराला अटक करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच, मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली परिस्थिती नियंत्रणात आणून पथकातील अधिकाऱ्यांचा हल्लेखोरांपासून बचाव केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@