कोरोना कहर भाग ३३ : कोरोना आणि रोगप्रतिकारक शक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2020
Total Views |

Corona_1  H x W
 
 
आपली रोगप्रतिकारक शक्ती ही बाहेरील जंतूंपासून शरीराचे संरक्षण करण्याचे काम अतिशय तत्परतेने व चोख बजावत असते. परंतु, जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, तेव्हा रोगकारक जंतू शरीरात प्रवेश करुन शरीराला कमकुवत करत असतात. खरंच का आपण आपले राहणीमान, सवयी, अन्न यांच्या मदतीने रोगप्रतिकारक शक्ती सुधारु शकतो? होय! आपण असे जरुर करु शकतो. आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला उद्दिपीत करणे किंवा मजबूत बनवणे ही खरोखर एक उत्साही क्रिया आहे. मुख्यत्वे हे जाणून घ्या की, रोगप्रतिकारक शक्ती ही एक संस्था आहे, जी अनेक घटकांच्या संलग्नतेने चालत असते. शरीर व मनाच्या समतोलाने ती चालत असते. जर आपण आपल्या शारीरिक सवयी, चुकीच्या पद्धती, तसेच आपल्या भावनात्मक, विचारात्मक व आध्यात्मिक विचारसरणीत सकारात्मक बदल केला, तर मात्र आपण नक्कीच आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवू शकतो. शारीरिक पातळीवर आपले सकारात्मक पाऊल म्हणजे आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे.
 
 
जर आपण आपल्या सवयी आरोग्यदायी ठेवल्या, तर शरीराच्या सर्व संस्था त्याला सकारात्मक प्रतिसाद देतात. त्यात रोगप्रतिकारक शक्ती ही आलीच. शारीरिकदृष्ट्या खालील आरोग्यदायी सवयी ठेवाव्या.
 
 
> धुम्रपान करु नये.
> आहारात फळे, भाजीपाला व भरपूर पाणी प्यावे.
> नियमित व्यायाम करावा.
> वजन नियंत्रणात ठेवावे.
> मद्यपान करु नये व करतच असल्यास अतिशय कमी करत जाऊन मग बंद करावे.
> व्यवस्थित झोप घ्यावी.
> स्वत:च्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. हात, तोंड स्वच्छ धुवावे.
> सहसा धावपळीचे काम-नियोजनबद्धतेने करावे.
 
 
आहारामध्ये चौरस आहार ठेवावा. सहसा सततचे हॉटेलचे खाणे, तसेच जंक फूड टाळावे, शिळे अन्न खाण्याचे टाळावे. दिवसातून चार वेळा अन्नसेवन करावे. सकाळची न्याहारी, दुपारचे जेवण, संध्याकाळचे थोडे खाणे व रात्रीचे जेवण असा नियम करावा. सकाळची न्याहारी भरपेट करावी, त्यानंतर दुपारचे जेवणही व्यवस्थित सकस आहार घेऊन करावे, ज्यात भात, डाळी, भाजी-पोळी, कोशिंबीर, मासे, अंडी, चिकन यांचा समावेश असावा. जसाजसा दिवस पुढे सरकतो, तसतसे आपले खाणे कमी करत जावे. रात्रीचे जेवण अतिशय माफक घ्यावे. असे म्हटले जाते की, Eat breakfast like a king, lunch like a prince and dinner like a beggar. असे केल्याने शरीराची पचनसंस्था सुधारते व पचनसंस्था सुधारल्यावर पर्यायाने आपली रोगप्रतिकारक शक्तीदेखील सुधारते. आहाराचा आणि रोगप्रतिकारक शक्तीचा हा असा थेट संबंध आहे. पुढील भागात आपण याबद्दल अजून उपयुक्त माहिती घेणार आहोत.
 
 
- डॉ. मंदार पाटकर
 
 
@@AUTHORINFO_V1@@