भारती सिंह आणि हर्ष १४ दिवसीय न्यायालयीन कोठडीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2020
Total Views |

bharati singh_1 &nbs



मुंबई :
कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांनाही ४ डिसेंबरपर्यंत दोघांनाही न्यायलयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर हर्षला तळेजा तर, भारतीची कल्याण जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. दोघांवरही कंसंप्शनचे चार्जेस लावण्यात आले आहेत. एनडीपीएस कायदा १९८५, कलम २०अ, २०ब २ आणि २७अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनीही जामिनासाठी किला कोर्टात अर्ज दाखल केला आहे.


एनसीबीने काल खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे १५ बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि ४० ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले.तब्बल १७ तास चौकशी केल्यानंतर हर्ष लिंबाचीयाला अटक करण्यात आली.


घरात गांजा सापडल्यानंतर दोघांनाही प्रथम एनसीबीने ताब्यात घेतले. चौकशीनंतर भारती सिंह हिला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी एक ड्रग पॅडलरला पकडण्यात आले. त्याच्या चौकशीनंतर आज भारती आणि हर्षच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात दोघांच्या घरात ८६.५ ग्रॅम गांजा सापडला. या जप्तीनंतर दोघांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आले.भारती सिंह ही स्टॅण्डअप कॉमेडियन आणि अभिनेत्री आहे. सध्या ती 'द कपिल शर्मा शो'मध्ये काम करत आहे. भारतीने २०१७मध्ये लेखक हर्ष लिंबचियासोबत लग्न केलं. तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात 'इंडियन लाफ्टर चॅलेन्ज'मधून केली होती. यानंतर तिने अनेक कॉमेडी शोमध्ये काम केला. यामध्ये कॉमेडी सर्कस, कॉमेडी सर्कस महासंग्राम, कॉमेडी सर्कस का जादू, कहानी कॉमेडी सर्कस की आणि कॉमेडी नाईट्स बचाओ यांचा समावेश आहे.
@@AUTHORINFO_V1@@