‘लव्ह’ नव्हे ‘जिहाद’च!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2020
Total Views |

love johad_1  H



२००९ साली केरळ उच्च न्यायालयाने सरकारला ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्यास सांगितले होते. तसेच पोलीस अहवालातून मुलींच्या धर्मांतरासाठी षड्यंत्र आखून प्रयत्न केल्याचेही म्हटले होते. हे पाहता, ‘लव्ह जिहाद’ हिंदुत्ववादी भाजपने निर्माण केलेले मिथक नसून केरळ उच्च न्यायालयाच्या निकालातून समोर आलेले धडधडीत वास्तव असल्याचे स्पष्ट होते.



‘लव्ह जिहाद’वरुन देशभरात गदारोळ माजलेला असतानाच, भाजपशासित हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांनी त्याविरोधात कायद्याची घोषणा केली. मात्र, ‘लव्ह जिहाद’ची समस्या अस्तित्वातच नाही, असे म्हणणार्‍या काँग्रेसने यावरून मनोहरलाल खट्टर, शिवराजसिंह चौहान तसेच योगी आदित्यनाथ सरकारवर टीकेची झोड उठवली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते दिग्विजय सिंग आणि महाराष्ट्रातील सचिन सावंत किंवा काँग्रेसचा गुण लागलेल्या शिवसेनेच्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेकांनी ‘लव्ह जिहाद’ नाहीच, असे म्हटले. सर्वच काँग्रेसी नेत्यांच्या आक्षेपात एक धागा समान होता, तो म्हणजे ‘लव्ह जिहाद’ प्रत्यक्षात नसून तो केवळ भाजपचा अजेंडा आहे, ‘लव्ह जिहाद’ची भीती दाखवून भाजपला देशात सामाजिक विभाजन घडवायचे आहे आणि भाजपच्या नेत्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आंतरधर्मीय विवाह केले, तर तो ‘लव्ह जिहाद’ नाही का, त्यांच्याविरोधात नव्या कायद्याने कारवाई करणार का? असे अनेक मुद्दे काँग्रेसी नेत्यांनी उपस्थित केले. तथापि, वर्षानुवर्षे एकाच घराण्याच्या आदेशापुढे नंदीबैलासारखी मान डोलावण्याची सवय लागलेल्या या सर्वच काँग्रेसी नेत्यांच्या विचारक्षमतेला लकवा मारल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांवरुन स्पष्ट होते किंवा सारेच काँग्रेसी गांधी-नेहरु नावापुढे हांजी हांजी करणारे असल्याने त्यांच्या मेंदूला गंज चढला असावा, म्हणून त्यांना ‘लव्ह जिहाद’ व ‘लव्ह मॅरेज’मधला फरकही समजेनासा झाला. म्हणूनच ते ‘लव्ह जिहाद’सारख्या भयानक संकटाला टाळून त्याला भाजपचा अजेंडा ठरवत असल्याचे दिसते. वस्तुस्थिती मात्र नेमकी याच्या उलट आहे आणि ती काँग्रेसींच्या मद्दड मेंदूत किंवा हिंदुत्वाशी बेईमानी करणार्‍या शिवसेनेच्या डोक्यात जरी शिरली नाही तरी सर्वसामान्य जनतेने त्यांच्या विधानांवरुन भ्रमित होऊ नये म्हणून सांगितलीच पाहिजे.


प्रथमतः ‘लव्ह जिहाद’ व ‘लव्ह मॅरेज’मधील फरक स्पष्ट केला पाहिजे. कारण, भाजपशासित राज्यांमधील प्रस्तावित कायदा किंवा ज्या कोणत्या क्रियेचा उल्लेख ‘लव्ह जिहाद’ म्हणून केला जातो, त्यातून ‘लव्ह मॅरेज’ला विरोध केलेला नाही. हिंदू-मुस्लीम किंवा हिंदू-ख्रिश्चन किंवा आणखी कोणत्याही धर्मातील मुला-मुलींनी एकमेकांना समजून, दोघांच्या संमतीने नक्कीच विवाह करावा व ते स्वातंत्र्य त्यांना आहेच. पण, ‘लव्ह जिहाद’मध्ये नेमकी याच्या उलट परिस्थिती असते आणि ज्या ज्या प्रकरणांना ‘लव्ह जिहाद’ म्हटले जाते, त्याचा ‘लव्ह मॅरेज’शी काहीही संबंध नाही, नसतो. आजही कित्येक आंतरधर्मीय दाम्पत्य सुखाने संसार करत आहेत, पण ‘लव्ह जिहाद’मध्ये प्रपंचापेक्षा धर्माचा मुद्दा महत्त्वाचा मानला जातो व मुस्लीम मुलांकडून हिंदू किंवा अन्यधर्मीय मुली-महिलांना ठरवून लक्ष्य केले जाते. इथे ‘आसिफ’ नाव बदलून ‘राहुल’ होतो आणि निकिताला प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो, तर निकिताला आसिफची सच्चाई समजली की ती आपला धर्म सोडून त्याच्याबरोबर जाऊ इच्छित नाही. तेव्हा आसिफ निकिताच्या अपहरणाचा उद्योग करतो, तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणतो, तरीही निकिताने त्याला स्वीकारले नाही, तर आसिफ निकितावर थेट गोळ्या झाडतो. हरियाणातली ही घटना आणि अशाच कित्येक घटना सलीमने, अश्फाकने वा सोहेलने नाव बदलून किंवा लपवून कोण्या साक्षी, अंजली किंवा गीताशी केल्याचे ठिकठिकाणी आढळते. जर इथे विषय प्रेमाचा असेल, तर आसिफने निकिताशी मैत्री, प्रेम, लग्नासाठी आपले नाव व धर्म का बदलावा? तसेच निकितानेही धर्मांतर करुन मुस्लीम धर्मात सामील व्हावे, असा दबाव का आणावा? इथेच यात ‘लव्ह’ नसून केवळ ‘जिहाद’ असल्याचेच स्पष्ट होते.



पुढचा मुद्दा आसिफ असे का करतो, याच्याशी संबंधित आहे. मुस्लिमांच्या कुराण या पुस्तकातील आयत क्र. २:२२१ ही वाचली व तिचा अर्थ समजून घेतला की, बिगर मुस्लीम मुलींच्या धर्मांतराचे कारण समजते. कुराणातील या आयतमध्ये स्पष्टपणे सांगितले की, कोणीही मुस्लीम व्यक्ती बिगरमुस्लीम स्त्रीशी निकाह करु शकत नाही, जोपर्यंत ती धर्मांतर करत नाही. कुराणातील ही आयत कोणीही शोधू शकतो, वाचू शकतो आणि आताच्या जमान्यात मुस्लिमांनी इस्लामच्या प्रचारासाठी स्वतःच सर्व आयती सर्वत्र उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. आसिफने राहुल नाव धारण करुन निकिताला फसवणे, धर्मांतरासाठी दबाव आणणे आणि नंतर गोळीबार करुन जीवे मारणे, हा सगळाच प्रकार या ‘लव्ह जिहाद’चाच आहे आणि हा केवळ भाजपचाच अजेंडा नाही. हिंदू बहुसंख्य असल्याने हिंदूंंच्या मुलींशी केलेल्या ‘लव्ह जिहाद’ची काही प्रकरणे समोर येतात, तर असाच प्रकार ख्रिश्चन मुलींच्या बाबतीतही होतो. ‘कॅथॉलिक बिशप्स इन केरला’ या ख्रिश्चन पाद्रींच्या संघटनेने यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील वाढत्या ‘लव्ह जिहाद’च्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच ‘लव्ह जिहाद’मध्ये ‘इस्लामिक स्टेट’ किंवा ‘इसिस’ संघटनेचा हात असल्याचे म्हटले होते. ‘ग्लोबल कौन्सिल ऑफ इंडियन ख्रिश्चियन्स’ या संस्थेनेदेखील ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात असल्याचे सांगितले होते व संस्थेने ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या दोन हजारांहून अधिक मुलींची आकडेवारीही जारी केली होती. राष्ट्रीय अल्पसंख्य आयोगाचे सदस्य जॉर्ज कुरियन यांनीही ‘लव्ह जिहाद’ची समस्या असल्याचे मान्य करत केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र पाठवून ‘एनआयए’ तपासाची मागणी केली होती. इतकेच नव्हे, तर २००९ साली केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तयार करण्यास सांगितले होते. तसेच काही पोलीस अहवालातून मुलींच्या धर्मांतरासाठी षड्यंत्र आखून प्रयत्न केले गेले व यामागे काही संघटनांचा हात असल्याचेही दिसते, असेही न्यायालयाने म्हटले होते.


वरील प्रकार पाहता ‘लव्ह जिहाद’ हिंदुत्ववादी भाजपच्या नेत्यांनी निर्माण केलेले मिथक नसून केरळ उच्च न्यायालयाच्या निकालातून समोर आलेले धडधडीत वास्तव असल्याचे स्पष्ट होते. पण, सेक्युलरिझमचा मोतीबिंदू झालेल्या काँग्रेसी नेत्यांना ते दिसणार नाही. कारण, त्यांनी स्वातंत्र्यानंतर सातत्याने केवळ हिंदूविरोधाची व मुस्लिमप्रेमाचीच भूमिका घेतली. हिंदूंच्या मुलींना कोण्या मुसलमानाने फसवावे, धर्मांतर करावे, चाकू खुपसावे, सुटकेसमध्ये भरुन रस्त्यावर बेवारस फेकून द्यावे किंवा गोळ्या घालून मारुन टाकावे, काँग्रेसला काहीही फरक पडत नाही. उलट काँग्रेस अशा कृत्यांना प्रोत्साहन देऊन पाठीशी घालण्याची तत्परता दाखवेल आणि आता तेच होत आहे. काँग्रेसला हिंदूंची नव्हे, तर मुस्लिमांच्या मतपेटीची चिंता वाटते, आताच्या बिहार व इतरत्रच्या पोटनिवडणूक निकालांनी तर मुस्लीम आपल्यापासून दुरावल्याची भीतीही काँग्रेसला वाटते. त्या मुस्लिमांनी आपल्यापासून लांब जाऊ नये किंवा असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमच्या पाठीशी उभे राहू नये, ही काँग्रेसची इच्छा आहे. त्यासाठी त्यांना हिंदूविरोध करावाच लागणार, ‘लव्ह जिहाद’चे अस्तित्व नाकारुन काँग्रेस तेच करत आहे. त्यासाठी भाजप नेत्यांच्या विवाहावर प्रश्नचिन्ह लावत आहे, पण ‘लव्ह मॅरेज’ व ‘लव्ह जिहाद’मधला फरक काँग्रेसींना समजत नाही. तो सर्वसामान्य हिंदूंनी समजून घ्यावा इतकेच, कारण, काँग्रेस आज आहे उद्या नसेल, पण हिंदू इथे हजारो वर्षांपासून आहे आणि हिंदूंना इथे पुढेही हजारो वर्षे राहायचे आहे.
@@AUTHORINFO_V1@@