अजित पवारांच्या 'त्या' विधानावर उद्धव ठाकरे म्हणाले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2020
Total Views |

cmo_1  H x W: 0



मुंबई :
कोरोनापासून राज्यातील जनतेचा बचाव वाचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यापुढेही सरकार आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करेल. पण नागरिकांना काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. गर्दी टाळावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. त्यांनी आज राज्यातल्या जनतेशी संवाद साधला.


दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट, मुंबईत कोरोनाचा चढता क्रम, मंदिरातील गर्दी, शाळा पुन्हा सुरु करणे, लॉकडाऊन यांसह अनेक विषयांवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे म्हणाले, “आपण सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं उघडली आहेत. चार दिवसांवर कार्तिकी वारी येत आहे. कार्तिकीची वारी साधेपणाने पार पाडा. गर्दी न करता सण-उत्सव साजरे करा. कोरोनाचं संकट टळलेलं नाही, तरुणांनो सावध राहा. येणारी लाट आधीच्या लाटेपेक्षा अधिक उग्र असू शकते. २४-२५कोटी जनतेला आपल्याला लसीकरण करावं लागणार आहे. एकदा डोस दिला, तर पुन्हा बुस्टर डोस द्यावे लागणार आहे. डोस दिल्यावर रुग्णाला कोणत्या तापमानात ठेवायचं हे सर्व अधांतरी आहे. त्यामुळे हात धुवा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि मास्क लावा ही त्रिसूत्रीच पाळावी लागणार आहे.”


दरम्यान, सरकार पुन्हा लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारतील का? असा प्रश्न राज्यातील जनता उपस्थित करत आहे. यावर बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, येत्या ८ ते १० दिवसांत परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल, त्यानंतर टाळेबंदीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात बोलताना “दिवाळीच्या वेळी लोकांनी अशी गर्दी केली. असे वाटतं होते की या गर्दीत कोरोना चिरडून मेला काय? असा प्रश्न मलाही पडला." मात्र विधानावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणले की, "कोरोना हा गर्दीत चिरडून मरत नसतो तर तो आणखी वाढतो."


पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “काही लोक मला रात्रीचा कर्फ्यू करण्याचं सूचवत आहेत. पण सर्व गोष्टी कायदे करुन होणार नाही. आपणच आपली जबाबदारी पाळली पाहिजे. दिवाळीत आपण फटाकेबंदी केली नाही, पण आपण फटाके फोडले नाहीत. त्यासाठी कायदे करण्याची गरज पडली नाही. कोरोनाचे संकट संपलेलं नाही. कोरोनाच्या आधीच्या परिस्थितीचा विचार करता आगामी कोरोना साध त्सुनामी असेल की काय असं वाटत आहे.आपण एका वळणावर आलेलो आहोत. पुन्हा लॉकडाऊनकडे जायचं नाही. आपण एका वळणावर असल्याने आपल्या हालचालींवर आपण नियंत्रण ठेवायला हवं. व्हॅक्सीन येईल तेव्हा येईल, सध्या आपण काळजी घ्यायला हवी,” असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
@@AUTHORINFO_V1@@