'पत्री पूलाचे काम केंद्र सरकारमुळे मार्गी शिवसेनेने श्रेय घेऊ नये'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2020
Total Views |

ठाणे _1  H x W: 


'पत्री पूलाचे काम केंद्र सरकारमुळे मार्गी 
शिवसेनेने श्रेय घेऊ नये' ; भाजपच्या रेखा चौधरी यांचा शिवसेनेला टोला



कल्याण : कल्याणच्या पत्री पूलाचे गर्डर लॉचिंग करण्याचे कामाचे श्रेय शिवसेना घेत असली तरी हे काम केंद्र सरकारने केले असल्याचा दावा भाजप नगरसेविका रेखा चौधरी यांनी केला आहे. शिवसेनेकडून त्याचे श्रेय घेण्यात येऊ नये. त्यांच्यामुळे पूलाच्या कामाला विलंब झाला असल्याच्या टिका चौधरी यांनी केली आहे.
 
 
आज पत्री पूलाच्या 700 मेट्रीक टन गर्डर हायड्रोलिक प्रेशर पद्धतीने 39 मीटर सरकविण्यात आला. त्यासाठी 4 तासाचा रेल्वेचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. उद्या गर्डरचा उर्वरीत भाग सरकविला जाणार आहे. त्यासाठीही उद्या चार तासाचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या पूलाचे गर्डर सरकविण्याचे काम सकाळी दहा वाजता सुरु झाले. एकीकडे हा सोहळा शिवसेनेकडून साजरा केला जात असताना भाजप नगरसेविका चौधरी यांनी पूलाच्या दुस:या टोकाला उपरोक्त टिका केली. केंद्र सरकारमुळे हा पूल होत आहे. शिवसेनेमुळे पूलाची कामे रखडलेली आहे. कल्याण डोंबिवलीतील कोपर, पलावा, माणकोली, दुर्गाडी पूलाची कामे रखडली असल्याने या पूल कोंडीतून नागरीकांची सूटका करण्यात यावी अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.
 
 
दरम्यान मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पूलाचे गर्डर टाकण्याचे काम लॉचिंग केले जात असल्यासारखे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही अशी आमदार पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे पूलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले. डोंबिवली हे त्यांचे आजोळ आहे. कल्याण डोंबिवलीतील अन्य पूलांची कामे रखडलेली आहे. ती मार्गी लावण्यासाठी ठाकरे यांनी लक्ष घालावे अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
 
 
पूलाचे गर्डर टाकून वाहतूक कोंडी सुटणार नाही. पूलाला जोडणारा 90 फूटी रस्त्याचा अप्रोच रोडचे काम अर्धवट आहे. हे काम शिवसेनेच्या माजी महापौरांमुळे हा रस्ता रखडला आहे. या रस्त्याचे काम का रखडले आहे. याचा जाब विचारण्यासाठी पूलाच्या कामाच्या ठिकाणी मनसे आमदार व मनसे कार्यकर्ते निघाले असता त्यांना पोलिसांनी रोखले. आमदारांनी याठिकाणी आयुक्ताना बोलवा अन्यथा आम्हाला त्यांच्या भेटीसाठी जाऊ द्या असा आग्रह धरला. हे मनसेचे आंदोलन नाही. तरी देखील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नाचे कारण पोलिस का सांगता असा सवाल उपस्थित केला. अखेर पाटील यांनी आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला असता आयुक्त निघून गेले होते. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांच्याकडून सोमवारी भेटीची वेळ मागून घेतली आहे.
 
 
दुसरीकडे पूलाचे गर्डर टाकताना पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी केवळ पत्री पूलाचेच काम केले जात नसून राज्यातील विविध पूल आणि रस्ते विकासाची कामे महाविकास आघाडीकडून मार्गी लावली जात आहे. शिवसेना निवडणूकीपूरते राजकारण करते. निवडणूक झाली की विकास कामे करते. अन्य पक्षाना निवडणूक संपली तरी वर्षाचे 12 महिने राजकारण करण्यात स्वारस्य आहे, असा टोला विरोधकांना लगावला आहे. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर विनिता राणे , आमदार विश्वनाथ भोईर आदी उपस्थित होते. पूलाचे गर्डर टाकण्याचे काम सुरु करण्यापूर्वी खासदार शिंदे यांनी कल्याण पूव्रेतील जरीमरी देवीच्या मंदीरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी या पूलाचे काम पुढील 300 वर्षे टिकेल असे करण्यात आले आहे. पूल डिसेंबर अखेर वाहतूकीसाठी खुला केला जाईल. विरोधकांनी विकास कामाला तरी विरोध करु नये अशी अपेक्षा व्यक्त केली. गर्डर टाकण्याच्या कामाच्या ठिकाणी रेल्वेचे अभियंते, अधिकारी, पोलिस अधिकारी, वाहतूक पोलिस, रेल्वे सुरक्षा बलाचा फौज फाटा तैनात होता.
 
 
@@AUTHORINFO_V1@@