सरकार आहे की छळवणुकीचे केंद्र ? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2020
Total Views |

ashish shelar_1 &nbs



मुंबई :
ठाकरे सरकारने वर्षभरात राज्याची दयनीय अवस्था केली, त्याचा मतदारांनी मत पेटीतून निषेध करावा. ठाकरे सरकार पळपुटे आणि पराधीन आहे, अशी घणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली.महाविकास आघाडीच्या प्रचार यंत्रणेचा निषेध आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

आशिष शेलार म्हणाले,"ठाकरे सरकारने ना पॅकेज दिले ना मदत. मागणी केली की केंद्राकडे बोट दाखवतात, मराठा आरक्षणावर विचारलं की सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवतात, बदल्यांचा विषय आला की दलालांकडे बोट दाखवतात.“कशाची चौकशी करायची ती करा पण तुम्ही जे आश्वासन दिलं ते तरी पूर्ण करा. 100 युनिट वीज मोफत देणार हे आश्वासन होत ते पूर्ण करा. ऊर्जामंत्री नितीन राऊत वसुली अधिकाऱ्यासारखं बोलतात” अशी टीकाही आशिष शेलारांनी केली.

महाआघाडीचा एक नेता म्हणाला, 'मतदारांशी संभाळून बोला ते रेकॉर्ड करतील'. अशा प्रकरारे मतदारांवर अविश्वास दाखवणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो, असे आशिष शेलार यांनी सांगितले. याचबरोबर, ठाकरे सरकार दोनच गोष्टींची चिंता करते. बॉलिवूड मुंबईबाहेर जाऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. ते बॉलिवूडची चिंता करतात आणि सुपुत्र पब आणि बारची चिंता करतात, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. सध्याचे सरकार अकार्यक्षम आहे. पुण्याच्या कोरोना आकडेवारीबाबत मी सांगण्याची गरज नाही. पब, बार आणि रेस्टॉरंट नियम घालून उघडली जाऊ शकतात तर योग्य नियम घालून मंदिरं का उघडली जाऊ शकतात? कोणीही मागणी करत नसताना पब, रेस्टॉरंटची वेळ का उघडली? असे सवाल आशिष शेलार यांनी केले.
याशिवाय, शाळा सुरू करण्याबाबत सरकारने संभ्रमाचे वातावरण तयार केले आहे. राज्य सरकारने त्या शाळा सुरू करण्याची तारीख दिली. ती देताना जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांची बैठकही घेतली नाही. शिक्षकांचेही प्रश्न आहेत. सरकार आहे की छळावणुकीचे केंद्र आहे? असा सवाल करत सरकारने सर्व घटकांशी चर्चा करावी आणि मग निर्णय घ्यावी, असे आशिष शेलार म्हणाले. सरकारने राज्यपालांकडे १२ नावे दिले आहेत. राज्यपालांना लिखित अलिटीमेंटम कसे देता येईल? हा शब्दच मान्य नाही. तसेच, मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी माझ्याकडे नसली तरी आम्ही काम एकत्रित करतो, सामूहिक करतो. माझ्याशी चर्चा करून निर्णय घेतला, असे आशिष शेलार यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@