सावध ऐका पुढल्या हाका! लव्ह जिहाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2020
Total Views |

Love Jihad_1  H
 
 
‘लव्ह जिहाद’ आपल्या समाजाने प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनेपायी लपवून ठेवलेली समस्या आता भीषण स्वरूप धारण करून समाजासमोर उभी ठाकली आहे. याचे तात्कालिक कारण ठरले ते ‘तनिष्क’ दागिन्यांच्या ‘एकत्व’ जाहिरातीचे. त्यावर समाजमानसातून आलेल्या प्रतिक्रियेचे आणि काही राज्य सरकारे आणत असलेल्या ‘लव्ह जिहाद’ प्रतिबंधक कायद्याचे. ही समस्या काही नवीन नाही. त्यावर उघडपणे सुरू झालेली चर्चा मात्र नवीन आहे. ही समस्या जरी नकोशी असली तरी त्यावर आता सुरू झालेली चर्चा मात्र हवीशी आहे. तेव्हा, ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय? तो घडतो कसा, त्यावरील उपाय काय, उपाय करू पाहणाऱ्या पालकांना काय समस्या भेडसावतात हे जाणून घ्यायलाच हवे.
 
 
‘लव्ह जिहाद’ हा मुस्लीम लोकसंख्या वाढविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या असंख्य मार्गांपैकी एक मार्ग. अन्य धर्मातील जननक्षम मुलींना, विवाहित महिलांना आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचे, विवाह करून अथवा न करता आपल्या घरी न्यायचे आणि त्यांच्या शरीराचा वापर करून मुस्लीम मुले जन्माला घालायची. एक स्त्री पूर्णपणे फसली, तिचे स्त्रित्व वापरून झाले, तिचे परतीचे मार्ग बंद झाले की, नवीन सावजाचा शोध सुरू करायचा. भारताच्या प्रत्येक शहरात आणि गावात हे प्रकार घडवून आणण्यासाठी विविध संस्था स्थापन करायच्या, तरुणांना प्रशिक्षण द्यायचे, त्यांची आर्थिक व्यवस्था उभी करायची, दरवर्षी हजारो मुलींना फसवून आणायचे, अशा प्रकारच्या विवाहांना पाठिंबा देणारी, प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी माणसे अन्यधर्मीय समाजात पोसायची, असे हे ‘लव्ह जिहाद’चे खरे स्वरूप आहे.
 
 
हे वाचायला जितके सरळ आहे, तितकेच ज्यांच्या जीवनात हे घडते, अशा मुलींच्या आणि कुटुंबांसाठी भयानक आहे. आईवडिलांनी प्रेमाने वाढविलेली, आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असलेली, निर्णय स्वातंत्र्य असलेली मुलगी जीवनात चांगल्या जोडीदाराची निवड करेल, अशी अपेक्षा आईवडील करीत असतात. पण, अचानक त्यांना समजते की, आपल्या मुलीने आपल्याला न सांगता तिच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या किंवा सलूनमध्ये काम करणाऱ्या किंवा टायर पंक्चर काढणाऱ्या मुस्लीम मुलाशी लग्न करायचे ठरवले आहे. लग्न रजिस्टर करण्यासाठी नोंदणी कार्यालयात जी नोटीस लावली जाते, त्यामधून ही माहिती त्यांना कळते आणि एक धक्का बसून पालक जागे होतात. लहानपणापासून हिंदू संस्कारांत वाढलेली, उच्चशिक्षण घेणारी किंवा चांगली नोकरी करणारी आपली इतकी हुशार मुलगी असा मूर्ख निर्णय घेईल, यावर आधी त्यांचा विश्वासच बसत नाही. परंतु, विवाहनोंदणीची नोटीस तर खरी असते, त्यामुळे वस्तुस्थितीचा स्वीकार करावाच लागतो. मुलीची चूक झाली असेल, समजावून सांगितल्यावर तिला कळेल आणि ती निर्णय बदलेल, अशी पालकांची अपेक्षा असते. त्याप्रमाणे ते प्रयत्नदेखील सुरू करतात आणि लवकरच त्यांच्या लक्षात येते की, हा आजार खूप जुना आहे. मुलगी प्रेमसंबंधात इतकी पुढे गेली आहे की, आता तिचा आपल्यापेक्षा अधिक विश्वास त्या ढोंगी प्रियकरावर आहे. नको त्या अवस्थेतील अनेक पुरावे त्याच्याकडे आहेत. कदाचित, ती गर्भवती झालेली आहे, त्यामुळे माघार घेणे तिला शक्य नाही. आपल्याला विश्वास ठेवायला कठीण जाते. परंतु, अनेक प्रकरणांमध्ये मुलींच्या अंगावर जादूटोणा, संमोहन यांचीही लक्षणे आढळतात.
 
 
पालकांची धडपड सुरू होते. बदनामीच्या भीतीने काही जण गुपचूप प्रयत्न करतात. बदनामी झाली तरी चालेल; पण मुलगी वाचविणे महत्त्वाचे आहे, हे समजून काही पालक नातेवाईक आणि सामाजिक संस्थांची मदत घेतात. चर्चा, समुपदेशन, पुस्तकवाचन, जादूटोणा, देवदेवस्की, धाक दाखविणे, मारहाण असे त्यावेळी सुचतील ते बरे-वाईट उपाय केले जातात. अनेक पालक या मार्गांनी आपल्या मुलीला वाचवितात. अशा मुलींच्या जीवनात आलेले हे एक दुर्दैवी वळण टळते आणि त्या पुन्हा त्यांच्या शिक्षणाच्या, नोकरीच्या, योग्य विवाहाच्या मार्गाला लागतात. पण, सर्वच मुली अशा सुदैवी नसतात. प्रेमाच्या धुंदीत त्या फसतच जातात, लग्न करून किंवा न करता, मुलाच्या मोहल्ल्यात राहायला जातात. ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेली एखादी सामान्य घरातील मुलगी असो किंवा एखादी प्रथितयश अभिनेत्री असो, लगेचच घडणारी एक गोष्ट असते ती म्हणजे मातृत्व. आपण समाजात पाहतो की, आपल्या कुटुंबातील मुले-मुली विवाहानंतर अपत्य जन्मापूर्वी जोडीदाराला समजून घेण्यासाठी भरपूर वेळ घेतात. परंतु, ‘लव्ह जिहाद’मधून झालेल्या विवाहानंतर मात्र मुलगी लगेचच गर्भवती होते. कारण, मुलीला गर्भवती करणे, हा तिचे परतीचे मार्ग बंद करण्याचा उपाय असतो. आपले जीवन कसे सुरू आहे, याचा विचार मनात येण्यापूर्वीच ती दोन-तीन मुलांची आई झालेली असते आणि पुढचा विचार करण्याची तिची क्षमता नष्ट झालेली असते. जन्माला घातलेल्या मुलांना वाढवून ‘लव्ह जिहाद’साठी नवी पिढी तयार करणे आणि नव्या हिंदू मुलींना फसविणे इतकेच तिच्या हातात उरते.
 
 
‘लव्ह जिहाद’मधून झालेल्या विवाहात असे काय आहे की, आपण त्याला गुन्हा म्हणतो? प्रेमविवाह, स्त्री-पुरुष समानता, जोडीदाराच्या निवडीचे स्वातंत्र्य म्हणून अशा विवाहांना पाठिंबा द्यायला काय हरकत आहे? आपले अनेक ढोंगी पुरोगामी हिंदू असा पाठिंबा देताना दिसतात. मग काही राज्ये ‘लव्ह जिहाद’विरुद्ध कायदा का करत आहेत? मुळात ‘लव्ह जिहाद’ म्हणजे प्रेमविवाह नाही. ही मुलींची प्रेमाच्या ढोंगामधून फसवणूक आहे. या फसवणुकीची पद्धत समजून घेतली तर आपल्याला हे समजून येईल. गुन्हेगार आधी आपले खरे नाव लपवून हिंदू नाव धारण करतो, खोटी फेसबुक, ट्विटर अकाऊंट्स तयार करतो. मोबाईल रिचार्ज करण्याची दुकाने, गाड्या दुरुस्तीची ठिकाणे जिथे मुली येतात, अशा ठिकाणी सापळा लावतो आणि फसायला योग्य मुलगी शोधतो. तिला वेळोवेळी मदत करत, तिचा विश्वास संपादन करतो. जी मुलगी थोडी कमकुवत दिसेल, तिला पुढाकार घेऊन लैंगिक सुखाचा अनुभव देतो. विशिष्ट वयात ‘अशा’ मित्राची गरज असते, ती पूर्ण करतो. विविध मार्गांनी तिला विवाहासाठी तयार करतो. अनेक घटनांत फक्त अविवाहित मुलीच नाही, तर विवाहित महिलादेखील अशा जाळ्यात फसतात. मुलगी पूर्णपणे जाळ्यात फसली, आता ती परत जाणार नाही, याची खात्री पटल्यावरच आपण मुस्लीम असल्याचे उघड करतो. अनेक मुलींना मूल जन्माला आल्यावरच आपला नवरा मुस्लीम असल्याचे कळते. मग तिला धर्मपरिवर्तन करण्यासाठी जबरदस्ती सुरू होते. अपवादात्मक परिस्थितीत मुलगी त्याला सोडून निघून येते. बहुतांश वेळी स्वतःच्या नशिबाला आणि चुकीला दोष देत ती जीवन जगत राहते. इस्लामचा नाइलाजाने स्वीकार करते. इस्लामचा अभ्यास करून, तत्त्वज्ञान समजून घेऊन त्यामधील स्त्रियांचे दुय्यम स्थान समजून उमजून, ‘तिहेरी तलाक’ आणि ‘हलाला’ म्हणजे काय, याचा अभ्यास करून केलेले हे डोळस धर्मांतर नसते. असे धर्मांतर म्हणजे फसवणूक असल्याने ‘लव्ह जिहाद’ हा गुन्हा आहे. दरवर्षी भारतात हजारो हिंदू, जैन, शीख, बौद्ध, इसाई मुली या गुन्ह्याला बळी पडतात. हिंदूंची कोणतीही जात असे म्हणू शकत नाही की, आमच्या जातीत अशी फसलेली कुटुंबे नाहीत. हा सर्वदूर असणारा प्रश्न आहे. परंतु, या गुन्ह्याचे स्वरूप हजारो स्त्रियांची फसवणूक इतकेच मर्यादित नाही. त्यापेक्षा भयानक कारस्थानाचे ते केवळ एक अंग आहे. ते कारस्थान काय आहे आणि कधीपासून सुरू आहे?
 
 
ते कारस्थान आहे भारताला इस्लामी देश बनविण्याचे! इस्लामच्या जन्मापासून संपूर्ण जग इस्लामच्या सत्तेखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इजिप्त, पर्शिया जिंकल्यानंतर हे इस्लामी वादळ भारताच्या सीमेवर पोहोचले. काळाच्या ओघात गांधार, घुरीद, बलुचिस्तान, सिंध, पश्चिम पंजाब, पूर्व बंगाल त्याने गिळून टाकले. उर्वरित भारतावर ते घोंगावत आहेच. तैमुर, कासीम, खिलजी, तुघलक, घोरी, मुघल, आदिलशाह, टिपू अशा असंख्य राजवटींनी त्यांच्या काळात विविध मार्ग अवलंबून हे इस्लामीकरणाचे उद्दिष्ट काही प्रमाणात साध्य केले आहेच. त्याचेच आजचे रूप म्हणजे ‘लव्ह जिहाद.’ पूर्वीप्रमाणे युद्ध करायचे, संपूर्ण शहर काबीज करायचे, किल्ला जिंकायचा आणि सापडलेल्या सर्व स्त्रिया जनानखान्यात नेऊन अडकवायच्या, हे आता शक्य नाही. त्यामुळे त्यांना प्रेमाचे ढोंग करून हे उद्दिष्ट साध्य करावे लागते. एका पुरुषाचे धर्मांतर केले, तर संख्या एकाने वाढते. एका स्त्रीचे धर्मांतर केले, तर ती आणि तिच्यापासून जन्माला येणारी पाच मुले अशी सहाने संख्या वाढते. त्याचबरोबर एक पुरुष अनेक स्त्रियांना फसवून आणू शकतो. तितक्या पटीत संख्या वाढवता येते. पुरुषाला धर्मांतरित करण्यापेक्षा स्त्रीला धर्मांतरित करणे, हे असे अधिक परिणामकारक आहे. याचा विचार करून ‘लव्ह जिहाद’ हा महिलांवर होणारा अत्याचार म्हणून त्याचा प्रतिकार केला पाहिजेच; पण त्यासोबत भारताच्या इस्लामीकरणाचा एक प्रयत्न म्हणून देखील त्याकडे पाहायला हवे.
 
 
केवळ कायदा करून हा प्रश्न सुटेल का? तर मुळीच नाही. मग कसा सुटेल? मग कायदा करून उपयोग तरी काय? कायद्याचा मर्यादित उपयोग नक्की होईल. आज अशा कोणत्याही प्रसंगात मुलीचे पालक जेव्हा पोलिसांकडे जातात, तेव्हा यामध्ये कोणताही गुन्हाच झालेला नाही, असे पोलिसांचे मत असते. मुलगी सज्ञान असेल आणि ती आपण होऊन लग्न करीत असेल, लग्नासाठी धर्मांतर करीत असेल किंवा लग्नानंतर धर्मांतर करीत असेल, तर तो गुन्हाच नसतो. धर्मांतर करताना नव्या धर्मात मुलीसमोर काय भवितव्य वाढून ठेवलेले आहे, याची तिला मुळीच कल्पना नसते. परंतु, कायद्याला याबद्दल काही देणे-घेणे नसते. नव्या कायद्यामुळे यात थोडा बदल होईल. मुलीने नव्या धर्माची माहिती घेतली आहे का, हे पाहता येईल. पोलिसांची इच्छा असल्यास त्यांना हस्तक्षेप करता येईल. परंतु, ही समस्या सोडविण्याचे काम समाजालाच करावे लागेल. यावर असलेला पहिला उपाय म्हणजे, आपल्या धर्माचे आणि अन्य धर्माचे स्वरूप आपल्या घरातील सर्वांना अगदी लहानपणापासून ते वृद्धावस्थेपर्यंत सांगत राहणे. आज आपली परिस्थिती अशी आहे की, आपल्या धर्मावर होणाऱ्या टीकेबद्दल आपण अज्ञानी असतो. रामाने सीतेला वनात नेऊन सोडले म्हणजे पत्नीवर अन्याय केला. कृष्णाने १६ हजार स्त्रियांशी विवाह करून त्यांना अपमानित केले. असले कसले तुमचे देव, असा प्रश्न जेव्हा कोणी विचारतो, तेव्हा आपण माहितीअभावी यावर काहीच बोलू शकत नाही. आपली मुले या प्रश्नांनी निरुत्तर होतात, त्यांची धर्मावरील श्रद्धा एका प्रश्नाने डळमळीत होते. आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे, हे आपल्या मुलांना शिकविणे हे आपले कर्तव्य नाही का?
 
 
दुसरा उपाय म्हणजे, आपल्या मुलांना हिंदू धर्माच्या उपासनेचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करायला शिकविणे. माणसाला जशी भौतिक प्रगतीची गरज आहे, तशीच आध्यात्मिक प्रगतीचीही आहे. आपण स्वतः नियमाने उपासना करीत असताना, आपल्या घरातील मुलांना मात्र आपण ती सवय लावत नाही. हा त्यांच्यावर अन्याय नाही का? मोठे होत असताना त्यांची हिंदू धर्मावर निष्ठा उत्पन्न झाली नसेल, त्यांना आपल्या धर्माबद्दल काही माहिती नसेल, तर आपण जबाबदार नाही का? 
 
 
पुढचा उपाय आहे आपली सामाजिक सवय बदलण्याचा! ‘मी बरा आणि माझे काम बरे, मी कोणाच्या अध्यात मध्यात नसतो,’ असे ज्या समाजातील लोक वागत असतील, त्याला देवदेखील साहाय्य करू शकत नाही. ‘लव्ह जिहाद’ हा आपल्या समाजावर होत असलेला संघटित हल्ला आहे, त्यामुळे त्याचा प्रतिकारदेखील संघटितपणेच करावा लागेल. आपल्या नातेवाईकांची, शेजाऱ्यांची, परिचितांची मुलगी, सून यामध्ये फसताना दिसली, तर तिथे नाक खुपसावे लागेल. प्रसंगी पालक नाराज झाले तरी त्यांना संकटाची जाणीव करुन द्यावीच लागेल. आजचा काळ संघटित शक्तीचा आहे. संकटग्रस्त कुटुंबाला सामाजिक आधार देणे, हा या संकटावरचा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. संपूर्ण समाजाला या धोक्याची नीट जाणीव करून देणे आणि मुली फसण्यापूर्वीच त्यांना सावध करणे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. तोच हमखास यशस्वी होणारा उपाय आहे. फसलेल्या मुलीला सोडवून आणणे हे अतिशय आवश्यक; पण अत्यंत अवघड काम आहे. कायद्याचा वापर, आंदोलने, समुपदेशन, औषधी उपचार अशा अनेक उपायांचा वापर यामध्ये करावा लागतो. अतिशय चिकाटी वापरून हे उपाय करावे लागतात. साम, दाम, दंड, भेद अशा सर्व गोष्टींचा वापर ‘लव्ह जिहाद’ करणारे गुन्हेगार करीत असतात. त्यावर उपाय शोधू पाहणाऱ्या समाजालादेखील केवळ शासनावर, भगवंतावर आणि नशिबावर अवलंबून न राहता, मानवी प्रयत्नातील सर्व उपाय वापरावे लागतील.
 
 
 
आपल्याच समाजातील असणारे; परंतु आपली दिशाभूल करणारे असंख्य लोक अशा संकटात आपल्या मार्गात आडवे येतात. त्यांना कौशल्याने दूर ठेवणे हा या उपायांचाच भाग आहे. मुलीला फसवले गेल्यावर कितीही काळ गेला तरी ती परत येण्याची अजूनही शक्यता आहे, असे गृहित धरून तिच्याशी संपर्क ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. परधर्मातील गुलामीचा तिला कधी उबग येईल आणि सुखी जीवनात परत येण्याची आशा तिच्या मनात कधी उत्पन्न होईल, हे सांगता येणार नाही. त्यावेळी तिला संधी मिळणे आणि पालकांनी तिच्या संपर्कात असणे, हे यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. जगातील अनेक संस्कृती इस्लामी जिहादसमोर हतबल ठरल्या आहेत. हिंदू समाज आणि भारत देश या संकटाशी महम्मद कासिमच्या स्वारीपासून आजपर्यंत मागील सुमारे ११०० वर्षे लढत आहे. या संकटाचा पराभव करण्याचे सामर्थ्य जर जगातील कोणत्या समाजात असेल, तर ते भारतीय समाजात आहे. गरज आहे ती आपण जागे होऊन, सावध होऊन ते सामर्थ्य वापरण्याची! ‘लव्ह जिहाद’चे संकट, त्यावरील उपाय याबद्दल या छोट्या लेखात मांडलेले विचार आपल्याला उपयुक्त होतील, अशी आशा करतो.
 
 
@@AUTHORINFO_V1@@