याजिदींच्या नव्या बाबा शेखच्या निमित्ताने...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2020   
Total Views |

[_1  H x W: 0 x





आजही याजिदी समुदाय या अत्याचाराच्या छायेत आहे. या अशा परिप्रेक्षातही याजिदी आपला धर्म आणि त्याचे रितीरीवाज विसरले नाहीत. आमच्यावर भयंकर अत्याचार झाला तेव्हा कुठे गेला धर्म, कुठे गेला तो देव किंवा कुठे गेला बाबा शेख धर्मगुरू असे याजिदींनी विचारले नाही. त्यांच्या मनात तसा विचारही आला नाही. त्यांची धर्मसंबंधित आस्था आणि विश्वास कायम आहे. ही आस्था, हा विश्वासच याजिदी समुदायाला अनन्वित अत्याचारातूनही जगण्याचे बळ देत असेल हे नक्की.
 
 
 
ऑक्टोबर २०२० ला याजिदी धर्मगुरू खुर्टो हाजी इस्माईल यांचा वयाच्या ८७व्या वर्षी मृत्यू झाला आणि १८ नोव्हेंबर रोजी लालीश या पवित्र स्थानी याजिदी समुदायाने आपला नवीन धर्मगुरू निवडला. त्यांचे नाव अली अलयास. अली अलयास हे इस्माईल यांचे पुत्र. लालीश या पवित्र स्थानी अनेक याजिदी भाविक एकत्र आले. त्यांनी विधीवत पूजन करून अली अलयास यांना 'बाबा शेख’ म्हणून मान्यता दिली. 'बाबा शेख’ उपाधी म्हणजे याजिदींची धर्मगुरू पदवी.
 
 
 
याजिदी समुदाय पारशी, ख्रिश्चन, मुस्लीम आणि थोडा फार हिंदू धार्मिक संस्कृतीची सरमिसळच आहे. २०१४ साली 'इस्लामिक स्टेट्स’च्या (आयएसआयएल) अनन्वित अत्याचाराला घाबरून लाखो याजिदी इराकच्या सिंजीर पहाडांवर आश्रयाला गेले. मात्र, 'इस्लामिक स्टेट’ने या पहाडाला घेरून अक्षरश: याजिदींचा नरसंहार केला. महिला मुलींवर शब्दात सांगता येणार नाही, असे अत्याचार केले. 'आयएसआयएल’च्या कचाट्यातून सुटलेल्या मुलीबाळींनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराला जगासमोर मांडले. त्यांच्या वेदनेच्या कहाण्या ऐकून-वाचून जगाला वाटले की, इथे मानवता मेली आहे.
 
 
 
 
अतिरेक्यांची पाशवी विचारसरणी, मानवतेला कलंक फासणार्‍या अतिरेक्यांना त्यांच्या समजुतीनुसार त्यांना ७२ हूरऐवजी कयामतच्या रात्री दोजखच (नरकाची भट्टी) मिळेल. आमेन. हा अत्याचार याजिदींवर का झाला? ते काही निर्वासित किंवा घुसखोर नव्हते किंवा त्या परिसरात अल्पसंख्याक असूनही त्या परिसरामध्ये त्यांनी दहशतवाद माजवला नव्हता. उलट याजिदी समुदाय शांत आणि धर्माची बांधिलकी मानणारा आहे. या समुदायाने 'इस्लामिक स्टेट्स इराक अ‍ॅण्ड लेवेन्ट’ या दहशतवादी संघटनेला केव्हाही आव्हान दिले नाही. तरी त्यांच्यावर अत्याचार का झाला? तर अभ्यासकांच्या मते, अतिरेकी संघटनेला वाटते की, याजिदी समुदाय हा याजिद उमैय्यद यांचा वारसदार आहे.
 
 
 
याजिद उमैय्यद हा एक सत्तााधारी होता, जो स्वयंघोषित मुस्लिमांचा खलिफा बनला. याजिद उमैय्यद हा माविदचा मुलगा होता, माविदनेे इस्लामचे मोहम्मद पैगंबर यांच्या जावयाचा खून करून याजिदला राजसत्तेवर बसवले होते. पुढे अलीच्या जावयाचा करबालामध्ये खून केला. मोहम्मद पैगंबरांच्यानंतर अली आणि त्यांच्या पुत्राचा खून केला तो माविद आणि त्याचा पुत्र याजिद. याजिदी समुदाय या याजिदीशी संबंधित आहे. या एका समजापायी 'इस्लामिक स्टेट’ या अतिरेक्यांनी याजिदींची अक्षरश: कत्तल केली. 'इस्लामिक स्टेट्स’च्या अतिरेक्यांना याजिदीबद्दल जो समज आहे, त्याला कोणताही ठोस पुरावा नाही, असे अभ्यासक म्हणतात. बाराव्या शतकात शेख अदी इब्न मुसाफिर याने याजिदी या पंथाची स्थापना केली. या समुदायामध्ये ईश्वराला सर्वशक्तिमान मानतात.
 
 
 
इतके की, त्याने जरी जगाची निर्मिती केली असली, तरी तो प्रत्यक्ष जगाचे रक्षण करत नाही, तर त्याने निर्माण केलेले सात देवदूत जगाचे रक्षण करतात. हे सातही देवदूत निसर्गातीलच घटक आहेत. त्यापैकी प्रमुख देवदूत म्हणजे मोर. याजिदी मोराला 'मलक ताऊस’ नावाने पूजतात. त्यालाच दुसरे नाव आहे 'शायतन.’ आता या 'शायतन’चा उच्चार आणि अर्थ अरबीमध्ये 'शैतान’ म्हणून केला जाऊ लागला. 'शैतान’ अल्लाचा विरोधक आहे. त्यामुळे अल्लाच्या विरोधकाची पूजा करणारे म्हणूनही याजिदींवर अत्याचार व्हायलाच हवे, असे काही धर्मांधांना वाटते.
 
 
 
 
रोहिंग्या आणि उघूर यांच्यासाठी आवाज उठवणारे, 'ब्लॅक लाईव्हस मॅटर’ म्हणणार्‍यांनी याजिदींच्या नरकयातना सोईस्करपणे दुर्लक्षित केल्या. पण, तरीही गुलाम म्हणून खरेदी- विक्री झालेल्या आणि शब्दातीत अत्याचाराच्या बळी झालेल्या याजिदी महिलांना मदत करण्यासाठी जगभरातून अनेक देश, संस्था पुढे सरसावल्या. त्यात श्री श्री रविशंकर जी यांची 'आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थाही काम करते.
 
 
 
आजही याजिदी समुदाय या अत्याचाराच्या छायेत आहे. या अशा परिप्रेक्षातही याजिदी आपला धर्म आणि त्याचे रितीरीवाज विसरले नाहीत. आमच्यावर भयंकर अत्याचार झाला तेव्हा कुठे गेला धर्म, कुठे गेला तो देव किंवा कुठे गेला बाबा शेख धर्मगुरू असे याजिदींनी विचारले नाही. त्यांच्या मनात तसा विचारही आला नाही. त्यांची धर्मसंबंधित आस्था आणि विश्वास कायम आहे. ही आस्था, हा विश्वासच याजिदी समुदायाला अनन्वित अत्याचारातूनही जगण्याचे बळ देत असेल हे नक्की.
 



@@AUTHORINFO_V1@@