भारतीय सुरक्षादलाच्या शौर्याचे पंतप्रधानांकडून कौतुक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2020
Total Views |

jammu kashmir_1 &nbs


जम्मू काश्मीर :
जम्मू-काश्मीरच्या नगरोटा येथे गुरुवारी सकाळी सुरक्षा दलांनी पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मदच्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. २६/११ च्या वर्षपूर्ती दिनानिमित्त दहशतवादी मोठा षडयंत्र राबवण्याचा प्रयत्न करीत होते असल्याचा मोठा खुलासा करण्यात आला. मारले गेलेले ४ दहशतवादी पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मदचे होते. जम्मू-काश्मीरच्या नगरोटा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय बैठक पार पडली.


या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, एनएसए अजित डोभाल, परराष्ट्र सचिव व सर्व गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आमच्या सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा महान शौर्य दाखवले. त्यांच्या सतर्कतेमुळेच त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कट उधळण्यात यश मिळाले आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित ४ दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा केला असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली."


गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नगरोटा परिसरात सुरक्षा वाढवली आणि प्रत्येक नाक्यावर गाड्यांची जबरदस्त तपासणी केली गेली. या दरम्यान श्रीनगर जम्मू महामार्गावर सकाळी ४.२० वाजताच्या सुमारास काश्मीरच्या दिशेने जाणारा एक ट्रक जवानांनी ताब्यात घेऊन तपासणी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तपासणीदरम्यान ट्रक चालक उतरून पळाला.सुरक्षा बलाने जेव्हा ट्रकची तपासणी केली त्यावेळी त्यात पोत्यात लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. गोळीबारानंतर दहशतवादी जंगलाच्या दिशेने पळाले. जवानांनी त्याचा पाठलाग केला आणि कारवाई केली. शूर जवानांनी तीन तास कारवाई करून चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. याव्यतिरिक्त, दारुगोळा देखील मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. ३ डझन ग्रेनेड व ६ पिस्तूलही सापडल्या.
@@AUTHORINFO_V1@@