दै. ‘मुंबई तरुण भारत’चा दिवाळी अंक, दिवाळी फराळासारखाच चमचमीत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2020
Total Views |

AMAZON _1  H x  
दै. ‘मुंबई तरुण भारत’चा दर्जेदार मजकुराने संपन्न असा दिवाळी अंक वेळेत आमच्या हाती आल्याने आनंद द्विगुणित झाला आणि राष्ट्रीयत्वाच्या वारशाचा अभिमान वाटला. निसर्गाच्या तडाख्यानंतरही, आशावादी शेतकर्‍याचे मुखपृष्ठ, मानसिक बळ देणारे वाटले. किशोरजी शशितल यांनी ‘थर्ड वे- तिसरा पर्याय’मध्ये आदरणीय दत्तोपंतांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे विचार जाणून घेता आले. हिंदू जीवनदृष्टीचा विचार पायाभूत आहे, हे पटले. दस्तखुद्द केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनीच, व्यापक व मूलभूत बदलामागील भूमिका विशद केली आहे. पूर्व प्राथमिक, मातृभाषा, कौशल्याधारित सर्वांगीण विकास, अशी मजबूत पायाभूत उभारणी होणार आहे.
 
 
योगिता साळवी यांनी मेघालयाची समग्र सफर घडवली व भावबंध निर्माण केले. चिवट पण घातक चीनबाबतच्या पॉलिसीत बदल का व कसे आवश्यक आहेत, हे डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी तिबेट-तैवानची उदाहरणे देत सप्रमाण उलगडले आहे. डॉ. प्रमोद पाठक यांनी ‘परिवर्तित इस्लाम’ या लेखात मुस्लीम संकल्पना, अतिरेकी कारवायांच्या सावटाखाली सारे जग व्यापले आहे, परिवर्तन हवे आहे ते मदरशात, शरियत कायद्यात, हे त्यांनी प्रभावीपणे मांडले. असीमच्या सारंग गोसावींनी विकासाच्या हेतूने ‘संवादाचा सेतू जम्मू-काश्मीर, लडाख येथील अनुभव उलगडले आहेत. वेदकाळातील रुपाला, विश्ववारा, सूर्या यांची ओळख झाली. कुटुंबातील स्त्रीचे स्थान, शिक्षण, आर्थिक अधिकार इ .विस्तृत, अपरिचित माहिती देणार्‍या निर्मला कुलकर्णी यांना धन्यवाद. कोकणातील सॉफ्टवेअर इंजिनिअर, व्यावसायिक विनय सामंत यांची काजूप्रक्रियेबाबतची धडाडी, नायजेरियापर्यंतची, बिकट परिस्थितीत घेतलेली भरारीची गाथा विस्मित करणारी वाटली.
 
 
मॉरिशसच्या काळ्या वारशावर डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी योग्य तो प्रकाशझोत टाकला आहे. जगभरातील विविध देशांत कोरोनाशी दोन हात कसे केले, याचे थरारक अनुभव वाचले. त्यातही, न्यूझीलंडची देशभक्त जनता, पंतप्रधान यांचे कौतुक वाटले. हर्षदा सीमा यांनी जेमिनी गणेशन यांच्या वलयांकित पण भरकटलेल्या जीवनाचा चटका कन्या रेखाला कसा बसला, हे उलगडले. तसेच दिवाळी अंकातील तिन्ही कथा रंजक आणि बोधक आहेत. 14 कवितांची काव्यांजली विविधरंगी वाटली. वार्षिक राशिभविष्यात, समर्थवचने बोलकी वाटली. एकूणच तृप्तता देणारा मजकूर दिल्याबद्दल अंक शिलेदारांचे अभिनंदन व आभार!
 
 
अनिल पालये, बदलापूर
दै. मुंबई तरुण भारतचा दिवाळी अंक आता अ‍ॅमेझॉनवरही उपलब्ध
 
 
विषय वैविध्याने नटलेला दै. ’मुंबई तरुण भारत’चा वाचनीय दिवाळी अंक आता अ‍ॅमेझॉनवरही उपलब्ध आहे. तेव्हा खालील लिंकवर क्लिक करा आणि आजच आपला दिवाळी अंक ऑनलाईन ऑर्डर करा.




@@AUTHORINFO_V1@@