स्कॅम 2020 :‘बाबा का ढाबा’च्या मालकाची युट्यूबर विरोधात तक्रार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2020
Total Views |
Kangna Sushant_1 &nb



मालक कांता प्रसाद यांनी घेतली पोलीसांत धाव

नवी दिल्ली : आपल्या व्हायरल व्हीडिओमुळे चर्चेत आलेल्या ‘बाबा का ढाबा’चा आता एक वाद उभा राहिला आहे. या ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांनी मालवीय नगर पोलीस ठाण्यात युट्यूबर गौरव वासन विरोधात तक्रार केली आहे. पत्नीच्या व माझ्या मदतीसाठी लोकांनी दिलेली लाखो रुपयांच्या देणगीत अफरातफर झाल्याची माहिती त्यांनी या तक्रारीत दिली आहे. मात्र, गौरव याने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
 
 
 
‘बाबा का ढाबा’ हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर कांता प्रसाद यांच्या मदतीसाठी मोठ्या संख्येने लोक पुढे आहे. त्यांच्यासाठी देशभरातून लोकांनी मदत केली होती. मात्र, यात अफरातफर झाल्याचा आरोप कांता प्रसाद यांनी केला आहे. या प्रकारानंतर आता पोलीसांनी त्यात लक्ष घालून कडक कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. मात्र, गौरवने आपल्याकडे सर्व पुरावे आहेत. तसेच बँक खात्याचीही माहिती आहे. आलेली सर्व रक्कम आपण कांता प्रसाद यांना दिली आहे, असे स्पष्टीकरण त्याने दिले आहे.
 
 
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नी बादामी देवी आपले दुःख सांगून व्यक्त होत होत्या. कोरोनामुळे आपला धंदा बुडला असून दिवसाला शंभर रुपयेही मिळत नसल्याचे म्हटले होते. त्यांची व्यथा यू-ट्यूबर गौरव वासनने त्याच्या चॅनलवर मांडली होती. त्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यावर या ठिकाणी एकच गर्दी जमली होती.
 
 
 
दाम्पत्याला पैसे ट्रान्सफर करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, यात अफरातफर झाल्याचा आरोप कांता प्रसाद यांनी केला आहे. याला स्पष्टीकरण देत गौरवने बँक स्टेटमेंटची प्रत जाहीर केली आहे. मात्र, इंटरनेट युझर्स आणि मदतदाते यालाही समाधानकारक मानत नाहीत. त्यांच्या मते https://www.facebook.com/YouTubeswadofficial/posts/270065781185372 या पोस्टवर शेअर करण्यात आलेले स्टेटमेंट हे एडीट करण्यात आलेले आहे. तसेच त्यात आकडेवारीही स्पष्ट दिसत नाही.





@@AUTHORINFO_V1@@