धक्कादायक ! पाकमध्ये गणपती मूर्तीची विटंबना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2020
Total Views |

ganpati_1  H x
 
 
 
नवी दिल्ली : पाकिस्तानमधील कराची येथे गणपती आणि शंकराच्या मूर्तीची विटंबना केल्याचा प्रकार समोर आला. तेथील कट्टरपंथीयांच्या जमावाने एका हिंदू मुलावर पैंगबराची निंदा केल्याचा आरोप करीत प्राचीन मंदिरात तोडफोड केली. कराचीमधील भीमपुरा भागामध्ये हा भयानक प्रकार घडला. विशेष म्हणजे गेल्या २० दिवसातील ही तिसरी घटना आहे. यावेळी काही कट्टरपंथीय जमावाने पहिल्यांदा हिंदूंवर निंदेचा आरोप केला आणि त्यानंतर काही लोकांनी प्राचीन मंदिरात तोडफोड केली. यादरम्यान मंदिरात ठेवलेली गणेशाच्या आणि शंकराच्या मूर्तीची विटंबना केली.
 
 
 
 
 
 
पाकिस्तानमधील काही कट्टपंथींयांनी कोणताही पुरावा न देता हिंदू मुलावर निंदा केल्याचा आरोप लावला होता. त्यानंतर स्थानिक हिंदू समुदायाने तेथील पोलिसांकडे छळ होत असल्याचा आरोपदेखील याआधी केला होता. हे मंदिर कराचीतील भीमपुरा भागातील बाजारपेठेत स्थित होते. या जमावाने मंदिरातील देवाचे फोटोही फाडण्याचे काम केले, अशी माहिती देण्यात आली आहे. यापूर्वीही असेच हिंदू देवतांचा अपमान करण्याचे कुकृत्य काही जमावाने केले होते. सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यात स्थित नागारपारकरात धार्मिक अतिरेक्यांनी देवी दुर्गेच्या मूर्तीची विटंबना केली होती.
 
 
@@AUTHORINFO_V1@@