भारताची युवा बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू निवृत्त ?

    02-Nov-2020
Total Views |

PV Sindhu_1  H
 
 
मुंबई : भारतीय युवा बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने ट्विटरवर ' I Retire' अशी पोस्ट केली आणि क्रीडा वर्तुळात याची चर्चा रंगली. सिंधूने सोमवारी दुपारी ‘I Retire’ लिहून पोस्ट शेअर केली आणि डेन्मार्क ओपन ही अंतिम स्पर्धा होती याबद्दल सिंधूने एका लांब पोस्टमध्ये लिहिले असून निवृत्ती घेण्याचे ठरवले असल्याचे जाहीर केले होते. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि सर्वत्र याची चर्चा सुरु झाली.
 
 
परंतु, सिंधूची पोस्ट नीट वाचता तिने बॅडमिंटनमधून निवृत्ती न घेतल्याचे कळते. सिंधूने पोस्टमध्ये लिहिले की, “मी माझ्या भावनांबद्दल समोर येऊन बोलायचे विचार करीत आहे. मला याला सामोरे जाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे मी कबुल करते. हे इतके चुकीचे वाटते. म्हणूनच मी, ‘आता बस झाले हे सांगण्यासाठी आज लिहित आहे. तुम्हाला धक्का बसला असेल किंवा गोंधळ झाला असेल तर हे समजण्यासारखे नाही. परंतु, जेव्हा आपण हे वाचून संपले तेव्हा माझ्या दृष्टीकोनाबद्दल आपणास समजेल आणि आशा आहे की त्यास देखील समर्थन द्याल.” सिंधूच्या अशा पोस्टमुळे ती निवृत्त होत असल्याच्या चर्चांना उधाण आले.
 
 
सिंधूने असे धक्कादायक ट्विट केले त्यानंतर २५ वर्षीय शटलरने निवृत्ती घेण्याचे ठरवले असल्याचे वृत्त समोर येऊ लागले. तथापि, २५ वर्षीय सिंधूने स्पष्ट केले की सध्याच्या कोरोना परिस्थितीबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी तिने ही पोस्ट केली होती. ‘या साथीच्या रोगाने माझे डोळे उघडले, मी सर्वात कठीण प्रतिस्पर्ध्याशी लढण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेऊ शकले. मी हे आधीही केले आहे, मी हे पुन्हा करू शकते. पण संपूर्ण जगाचे निराकरण करणाऱ्या या अदृश्य विषाणूचा मी कसा पराभव करू,’ असे आपल्या पोस्ट मध्ये लिहिले.