मंदिरात नमाज पठण : चार जणांवर गुन्हा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2020
Total Views |

Mathura_1  H x
 
 

(हा प्रकार उघड झाल्यानंतर मंदिरात शुद्धीकरण करण्यात आले)




मथुरा : येथील नंदगांवच्या प्रसिद्ध नंदबाबा मंदिरात नमाज पठणाचा फोटो व्हायरल झाला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ ऑक्टोबर रोजीची ही घटना आहे. कोरोनामुळे मंदिरात गर्दी नव्हती. सुरुवातीच्या चौकशीत पोलीसांना समजले आहे की, नमाज पठण करणारे खुदाई खिदमतगार संस्थेचे लोक आहेत. मंत्री श्रीकांत शर्मा कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
 
 
या बद्दल मिळालेल्या सविस्तर वृत्तानुसार, ‘मंदिरात चार युवक घुसले. फैजल खान, मोहम्मद चांद, नीलेश गुप्ता आणि आलोक, अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी स्वतःला आपण हिंदू मुस्लीम संस्कृतीत विश्वास ठेवणारे म्हटले. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये संत-महंतांसोबत फोटोही काढले होते. त्यावेळी त्यांनी मंदिराचे सेवादार कान्हा गोस्वामी यांच्याकडे दर्शन करण्याची परवानगी मागितली होती. त्यांना परवानगी मिळाली. त्यावेळी फैझल आणि मोहम्मद चाँद नमाज पठण करत होते. त्यावेळी नीलेश आणि आलोक यांनी त्यांचे फोटो काढले. फोटो व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
 
 
मंदिरात नमाज पठण झाल्याने स्थानिक साधू संतांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कान्हा गोस्वामी यांनी बरसाना ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली आहे. पोलीसीं फैझल, चाँद, नीलेश आणि आलोक यांच्यावर कलम 153अ , 295 आणि 505 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
 
 
उत्तर प्रदेशचे अल्पसंख्यांक मंत्री मोहसिन रजा यांनी या प्रकरणी प्रश्न विचारला आहे. देशातील एक शायर फ्रान्सच्या समर्थनात आवाज का उठवतो. अलीगड मुस्लीम विद्यापीठातूनच असा आवाज का उठवला जातो. मथूरेत मंदिरात नमाज पठण करून माहौल बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीस या प्रकरणी कठोर कारवाई करतील. उ.प्रदेशचे उर्जा मंत्री श्रीकांत शर्मा म्हणाले. या प्रकरणी एफआयआर दाखल झाली आहे. जर कोणी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर कडक कारवाई करू.
 
 
काशी विद्वत परिषद (पश्चिमांचल) प्रभारी कार्षिणी नागेंद्र महाराज यांना याबद्दल सोशल मीडियाद्वारे वृत्त मिळाले आहे. देशातील शांती भंग करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. प्रशासनाला विनंती आहे, अशा लोकांविरोधात कठोर कारवाई केली जावी, अशी आमची विनंती आहे, असेही ते म्हणाले.
 
 
विश्व हिंदू परिषदेने या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रीया देत याला नमाज जिहाद म्हटले आहे. संस्थेचे प्रवक्ते विनोद बंसल यांनी मथूरा परिक्रमा मार्गावर इस्लामी जिहादींनी नमाज पठणाचा प्रयत्न केला आहे, असे म्हटले. या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कपटाने मंदिरात प्रवेश करणे, विनाकारण तिथे नमाज पठण करणे आणि त्या प्रकाराचे व्हीडिओ व्हायरल करणे ही कोणती मानसिकता आहे?
 
 
समानतेची गोष्ट करणाऱ्यांनी एक मुद्दा स्पष्ट करावा की, जे लोक हे ढोंग रचत आहेत, त्यांनी मशिदीत जाऊन हनुमान चालीसा, दुर्गा चालीसा किंवा आरती करून दाखवावी. जामा मशिद किंवा फतेहपुरी मशिदीत अशाप्रकारे कृत्य केले तर चालणार आहे का ?, असा प्रश्न त्यांनी या चौघांनाही विचारला आहे.


@@AUTHORINFO_V1@@