आता फ्रान्स हलालविरोधातही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2020
Total Views |

france_1  H x W
 
 
अस्तित्वच पणाला लागल्यावर धर्मनिरपेक्षता किंवा उदारमतवादाच्या तुणतुण्यापेक्षा स्वदेश, स्वजन आणि स्वसंस्कृतीला वाचवणे, रक्षण करणेच, फ्रान्सने प्राधान्याचे मानले. अशातच आता फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डर्मेनिन यांनी मुस्लिमांच्या हलाल मांसाविरोधात थेट विधान करत त्याविरोधातही पाऊल उचलले जाऊ शकते, असे संकेत दिले.
 
 
 
इस्लामी कट्टरपंथीयांकडून सातत्याने होत असलेल्या हिंसक व घृणास्पद कृत्यांविरोधात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन ठामपणे उभे असल्याचे दिसते. जगभरातील बहुतेक सर्वच व सौदी अरेबियासारखे मुस्लीम राष्ट्रही विरोधात जात असल्याचे पाहूनही फ्रान्स आपल्या नीतिमूल्यांशी तडजोड करण्याच्या मनःस्थितीत नाही. मॅक्रॉन तसेच फ्रान्सच्या जनतेची इस्लामी कट्टरपंथाविरोधात एकजुटीने लढण्याची हिंमत नक्कीच वाखाणण्यासारखी आहे. मात्र, इमॅन्युएल मॅक्रॉन व फ्रेंच नागरिकांनी मुस्लीम देशांना शिंगावर घेण्याचे धाडस दाखवले. कारण, इस्लामी कट्टरपंथामुळे फ्रान्सचे अस्तित्वच धोक्यात आले. अर्थात, अस्तित्वच पणाला लागल्यावर धर्मनिरपेक्षता किंवा उदारमतवादाच्या तुणतुण्यापेक्षा स्वदेश, स्वजन आणि स्वसंस्कृतीला वाचवणे, रक्षण करणेच, फ्रान्सने प्राधान्याचे मानले. अशातच आता फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डर्मेनिन यांनी मुस्लिमांच्या हलाल मांसाविरोधात थेट विधान करत त्याविरोधातही पाऊल उचलले जाऊ शकते, असे संकेत दिले. “सुपर मार्केटमध्ये फिरताना हलाल व कोषेर उत्पादने अलग ठेवलेली आढळतात, ते पाहून मी चकित झालो. मात्र, सुपर मार्केटमध्ये मुस्लिमांसाठी वेगळी जागा आहे, कोषेरसाठी स्वतंत्र जागा आहे, पण अशा सर्वांसाठीच विशिष्ट जागा का केलेल्या आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एखाद्या देशाच्या शक्तिशाली राजकीय नेतृत्वाने हलाल मांसाविरोधात उघडपणे भूमिका घेण्याची ही पहिलीच वेळ. पण, गेराल्ड डर्मेनिन यांच्या विधानामुळे इतके दिवस सर्वसामान्यांमध्ये, दबक्या आवाजात उल्लेख केल्या जाणार्‍या हलाल मांसाच्या मुद्द्यावर व्यापक चर्चा होण्याची शक्यता वाटते. कारण, फ्रान्स सध्या ज्या पद्धतीने इस्लामी कट्टरपंथाविरोधात झुंज देत आहे, ते पाहता हलाल मांसालाच हलाल करण्यापर्यंतही तो देश जाऊ शकतो. तसेच हलाल मांसाचा प्रश्न केवळ खाण्याच्या सवयी, आवडी-निवडीपुरता मर्यादित नाही, तर त्याचा संबंध थेट अर्थव्यवस्थेतील एकाधिकाराशी आहे.
 
 
 
 
एखाद्या समाजावर वर्चस्व गाजवण्याच्या निरनिराळ्या पद्धती असतात. शिक्षण प्रणालीवर नियंत्रण मिळवणे, इतिहासाची मोडतोड करुन वा पुसून नवेच काहीतरी सांगणे किंवा संबंधित समाजाच्या संस्कृतीला आपल्याला पाहिजे त्या प्रकारे वळण देणे, या पद्धतीने वर्चस्व गाजवण्याचे उद्योग केले जातात. अगदी आपल्या स्थापनेपासून आणि आताच्या घडीलाही जगभरात इस्लामने सर्वांनाच आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचे प्रयत्न केले, प्रयत्न सुरुही आहेत. पण, आता अन्य अनेक पद्धतींबरोबरच त्यात हलाल मांस किंवा हलाल खाद्यपदार्थांचाही समावेश झाला. हलाल मांसाचा प्रश्न जसा भारतात आहे, तसाच तो फ्रान्ससह जगभरात आहे. त्यावरुनच फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी आक्षेप घेतला व त्या देशाच्या निशाण्यावर आगामी काळात हलाल मांस असेल, असा संदेश दिला. ‘हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’च्या व्याख्येनुसार, “केवळ अल्लाच्या नावाने दिलेला बळीच हलाल ठरवण्यायोग्य असतो. तसेच हलाल करणारा कसाई मुस्लीमच हवा व प्राण्याला हलाल करण्याआधी त्याने ‘बिस्मिल्लाह’ आणि ‘अल्ला हू अकबर’चा उच्चार करणे अत्यावश्यक असते.” हलालच्या या व्याख्येवरुनच खाद्य उद्योगात नेमके काय सुरु आहे व त्यामुळे इतरांना/बिगर मुस्लिमांना किती झळ बसू शकते, याची कल्पना करता येते. जगभरातील मांस उद्योगात आपला एकाधिकार प्रस्थापित करण्याचा हा प्रकार असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. मुस्लीम बहुसंख्येत रुपांतरित झाले की त्यातील कट्टरपंथी आपल्या इच्छा इतरांवर थोपवण्याच्या मागे लागतात, त्यासाठी कोणत्याही थराला जातात. त्यामुळेच युरोपात हलाल खाद्य बाजार मुस्लीम लोकसंख्येबरोबरच वेगाने वाढत असून त्यावरच फ्रान्सने बोट ठेवल्याचे दिसते.
 
 
 
एका आकडेवारीनुसार जागतिक हलाल बाजार ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला असून २०२५ पर्यंत जागतिक हलाल मांस उद्योगावर मुस्लिमांचा एकाधिकार होईल व त्या बाजाराचे मूल्य ९.७१ ट्रिलियन डॉलर्स इतके असेल. खाद्यप्रक्रिया उद्योगांना धार्मिक परंपरांचे पालन करण्यासाठी बाध्य करुन त्यावर खर्च होणारा पैसा व नोकर्‍याही आपल्याच ताब्यात राहाव्यात, ही यामागची मुस्लिमांची मानसिकता आहे. पण, अर्थशास्त्राच्या नियमांनुसारही एखाद्या व्यवसाय वा उद्योगावर कोणाच्याही मक्तेदारी वा एकाधिकाराला योग्य मानले जात नाही. इथे तेच होताना दिसते आणि सध्याच्या फ्रान्समधील इस्लामविरोधी वातावरणात हा मुद्दा अधिक प्रकर्षाने समोर आणला जाईल, असे वाटते. फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डर्मेनिन यांच्या मते, “सुपरमार्केट धार्मिक अल्पसंख्याकांना विशिष्ट उत्पादनांची विक्री करुन अलगतेची भावना वाढीस लावतानाच एकाधिकाराला प्रोत्साहन देत आहेत.” डर्मेनिन यांच्या बोलण्याचा अर्थ इतकाच की, हलाल पद्धतीची मांस वा खाद्यपदार्थविक्री अजिबात योग्य नाही. सुपर मार्केट्सनी स्वतःहून ही उत्पादने विक्रीस ठेवणे बंद करावे, अन्यथा सरकारलाच त्याविरोधात कारवाई करावी लागेल, हे डर्मेनिन यांना सांगायचे आहे. फ्रेंच गृहमंत्र्यांची विधाने व हलालमागचे अर्थकारण पाहता, त्यांना इस्लामी कट्टरपंथ किंवा कुराण वा शरियानुसार वागणे व मुख्य प्रवाहापासून फुटून राहणे, सहन केले जाणार नाही, असेच सुचवायचे असल्याचे समजते. सध्या फ्रान्समध्ये मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र, शिक्षकाचा शिरच्छेद, नीस व अन्य ठिकाणी मुस्लीम धर्मांध जिहाद्यांकडून होणारे हल्ले व यामुळे संतापलेली मूळची फ्रेंच जनता असे चित्र दिसून येते. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीदेखील इस्लामी कट्टरपंथाविरोधात निर्णायक लढ्याला सुरुवात केली आहे. त्यातच तुर्की, पाकिस्तान व सौदी अरेबियासारखे मुस्लीम देश त्यांच्याविरोधात जात आहेत. कारण, त्यांना आपल्या देशातील इस्लामानुयायांना आपल्या पाठीशी उभे करण्यात हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच तुर्की आणि सौदी अरेबियामध्ये इस्लामी म्होरकेपणावरुन रस्सीखेच सुरु आहे. तरीही फ्रान्सने तुर्की वा सौदी अरेबियाचा विरोध पत्करुन इस्लामी कट्टरपंथाचे पालन-पोषण करणार्‍या प्रत्येक मार्गाविरोधात उघड भूमिका घेतली, यामुळे त्या देशाच्या धाडसाला नक्कीच दाद दिली पाहिजे. तसेच त्यांची ही भूमिका इतरांनाही प्रेरणादायी ठरेल, असे वाटते.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@