कोरोना कहर भाग ३१ : प्रतिक्रिया आणि रोगप्रतिकारकशक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2020
Total Views |

Corona epidemic_1 &n
 
 
 
प्रत्येक जीवंत प्राण्याची प्रेरणेला येणारी विशिष्ट प्रतिक्रिया ही ज्या प्रकाराने येेत असते, त्याच प्रकाराने मग शरीराची संरक्षण प्रतिक्रिया कार्यरत होत असते. शरीराच्या प्रतिक्रियेमुळे रोगप्रतिकारकशक्ती उद्दपित होते व अशी विशिष्ट प्रतिक्रिया शरीराने का दिली, याचा शोध घेतला जातो. यासाठी मेंदू व चेतासंस्था मदत करत असते. एकदा का या चेतासंस्थेला शोध लागला की, तातडीने हा निरोप या संरक्षक पेशींपर्यंत पोहोचवला जातो. म्हणजेच काय तर ‘इम्युनिटी’ किंवा ‘रोगप्रतिकारकशक्ती’ म्हणजे शरीराने व मनाने रोगकारक किंवा त्रासदायक गोष्टी किंवा घटक यांना केलेला अवरोध!



पण, नुसताच अवरोध नसतो, तर ज्याप्रमाणे घातक घटक अ‍ॅन्टिजेन हा शरीरात प्रवेश करतो. त्या अ‍ॅन्टिजेन ओळखून त्या वयानुसार व अ‍ॅण्टिबॉडी तयार करण्याचे मोठे कार्य हे या रोगप्रतिकारक संस्थेला करावे लागते. तसेच नुसती विशिष्ट अ‍ॅण्टिबॉडीज घटकद्रव्ये तयार होऊन काही फायदा नसतो. कारण, या अ‍ॅण्टिबॉडीज जर या बाहेरील विषारी घटकांपेक्षा (अ‍ॅन्टिजेन) कमकुवत असेल, तर रोग हा प्रतिकारशक्तीला बघत नाही व या अ‍ॅण्टिबॉडीज नष्ट होतात. रोगाचा प्रादुर्भाव हा मुख्यत्त्वे नैसर्गिक नियमानुसारच होत असतो.

 
 
निसर्गाचा नियम हा प्रत्येक आजारासाठी सारखाच असतो. होमियोपॅथीचे जनकडॉ. सॅम्युएल हॅनेमान यांनी त्यांच्या ‘ऑरगॅनॉन ऑफ मेडिसीन’ या पुस्तकात हा नियम खालीलप्रमाणे दिला आहे. ‘A weaker dynamic affection is permanently extinguished in the living organism by a stronger one, if the latter (whilst differing in kind) is very similar to the former in its manifestations.” या नियमांचा अभ्यास करुन मगच डॉ. हॅनेमान यांनी रोग व आरोग्य यांच्या बाबत आपले सिद्धांत मांडले व त्यानुसारच औषध सिद्धतेच्या नियमांना धरुन वैज्ञानिक पातळीवर होमियोपॅथीची औषधे तयार केली.



होमियोपॅथीची औषधे ही नैसर्गिक नियमांना धरुन असल्यामुळे व या औषधांच्या उपयोगासाठी वैयक्तिकीकरणाचा सिद्धांत (थिअरी ऑफ इंड्युव्हिजलायेशन) असल्यामुळे या होमियोपॅथीची औषधांना शरीर चांगल्याप्रकारे प्रतिसाद देते, म्हणूनच जर माणसाची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करायची असेल तर शास्त्रशुद्ध पद्धतीने व वैज्ञानिक पातळीवर तयार केली गेलेली पूर्णपणे नैसर्गिक असलेली होमियोपॅथीची औषधे हा मुख्य व सक्षम पर्याय सर्व लोकांच्या समोर आहे, म्हणूनच कुठल्याही फसव्या जाहिरातींना बळी न पडता, जर आपण होमियोपॅथीची कास धरली, तर आरोग्याच्या वाटेवर चांगल्या प्रकारे चालता येईल, रोगप्रतिकारकशक्तीसाठी अजून जे घटक उपयुक्त आहेत हे आपण पाहू.
 
 
- डॉ. मंदार पाटकर


(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)
 
 
@@AUTHORINFO_V1@@