पाकवर एअर स्ट्राईकची अफवा ! : नेमकं काय झालं वाचा सविस्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2020
Total Views |

POK_1  H x W: 0


(१३ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानचे लॉन्चपॅड उध्वस्त केल्याचे छायाचित्र)



जम्मू : "पाकव्याप्त काश्मीरवरात भारतीय सैन्याने पिनपॉईंट स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले", अशी बातमी गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान सगळीकडे झळकू लागली. अचानक पाकिस्तानवर हे 'एअर स्ट्राईक'चे वृत्त सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर हा पिनपॉइंट स्ट्राईक आहे, असेही सांगण्यात आले. मात्र, ही बातमी खोटी ठरली. 



पीटीआयच्या वृत्तानुसार ही माहिती देण्यात आली. दहशतवाद्यांचे लाँचपॅड भारतीय सैन्याने उध्वस्त केले आहेत. पाकिस्तानी दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यात भारतीय सैन्याला यश मिळाले आहे. विशेष म्हणजे भारताचे सर्व जवान सुखरुप परत आले आहेत, असेही सांगण्यात आले. मात्र, या बातमीत नेमकी वेळ आणि दिवस किंवा पाकिस्तानी दहशतवाद्यांचे नुकसान यांची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे ही अफवा असलेली बातमी सर्व प्रसिद्धी माध्यमांनी ब्रेकींग न्यूज म्हणून चालवली.
 
 
उत्तरेकडील भारतात थंडीचा जोर वाढत आहे. पाकिस्तानी सैन्य जास्तीत जास्त दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी करण्यासाठी सीमेपलीकडून भारतात पाठवत आहेत. त्यामुळेच भारतातर्फे संवेदनशील ठिकाणांवर निशाणा साधला जात आहे. दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्कराकडून लक्ष्य केले जात आहेत. पाकिस्तानी सैन्य एलओसीवर गोळे डागत आहे आणि भारताच्या भूभागांवर सतत हल्ले चढवत आहे. या तोफांच्या गोळ्याच्या आडून दहशतवादी घुसखोरीसाठी पाकिस्तानला मदत होत आहे. २०१९ मध्ये पाकिस्तानतर्फे झालेल्या तोफांच्या हल्ल्यांमध्ये एकूण १८ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. एकूण मृतांचा आकडा हा २१ इतका आहे.
 
 
या अफवेबद्दल सैन्याचे म्हणणे काय ?
 
 
पाकिस्तानवर भारताने एअर स्ट्राईक किंवा पिनपॉईंट एअर स्ट्राईक केला नाही, असे स्पष्टीकरण भारतीय सैन्यदलातर्फे संचालक लेफ्ट. जनरल परमजीत सिंह यांनी महा MTB व 'मुंबई तरुण भारत'च्या प्रतिनिधींशी बोलताना दिले. १३ नोव्हेंबर रोजी सीझफायर व्हॉयलेशनला लष्कराने प्रत्युत्तर दिले होते, आज कुठल्याही प्रकारचा गोळीबार सीमेवर झाला नाही, अशी माहिती भारतीय लष्कराने एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. त्यामुळे ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

 
काश्मीरात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न
 
 
पाकिस्तान जम्मू काश्मीरमध्ये अस्थिरता आणण्याचा प्रयत्न करत आहे. तरुणांच्या हातात हत्यारे पोहोचवण्याचे काम केले जात आहे. पाकिस्तान्यांचा सहभाग या कारवायांमध्ये दिसू नये, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला दबाव टाकता येऊ नये यासाठी भारतातील स्थानिकांना फुटीरतावादाच्या मार्गावर नेऊन नवा पॅटर्न निर्माण करण्याच्या तयारीत पाकिस्तान आहे. ग्रामीण भागांमध्ये जास्त हल्ले करण्याचे पाकिस्तानचे लक्ष्य आहे.
 
 
२६ फेब्रुवारी २०१९ रोजी झाला होता स्ट्राईक
 
 
गतवर्षी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिकार म्हणून २६ फेब्रुवारी २०१९ रोजी वायुसेनेने एअर स्ट्राईक केला होता. वायुसेनेच्या १२ मिराज-२००० फायटर लढाऊ विमानांनी बालाकोट, चकोटी आणि मुजफ्फराबादमध्ये बॉम्ब हल्ला केला होता. ३०० पेक्षा जास्त दहशतवादी यात ठार करण्यात आले होते. या कारवाईला 'ऑपरेशन बंदर', असे नाव देण्यात आले होते.
 
 
 
२९ सप्टेंबर २०१६ रोजी झाला होता पहिला सर्जिकल स्ट्राईक
 
 
१८ सप्टेंबर २०१६ रोजी जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी आर्मी कॅम्पमध्ये हल्ला केला होता. त्यात एकूण १८ जवान हुतात्मा झाले होते. त्याला उत्तर म्हणून २९ सप्टेंबर रोजी २०१६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये तीन किमी जाऊन दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला होता. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ४० ते ५० दहशतवाद्यांना ठार केले होते.





@@AUTHORINFO_V1@@