शेअर ट्रेडिंग एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2020
Total Views |
BSE _1  H x W:

 
 
 
आज प्रत्येक जण विचार करतोय एक कोणतातरी बिजनेस चालू करावा की त्यात मला थोडाफार नफा होईल मला एक दुसरे उत्पनाचे साधन भेटेल. पण समजत नाही कोणता बिजनेस करू कारण सगळ्याच बिजनेस मध्ये खूप स्पर्धा आहे आपण त्या बिजनेस मध्ये यशस्वी होऊ का नाही हे विचार सतत येत असतात.
 
 
 
माझ्यामते बिजनेसच करायचा असेल तर शेअर ट्रेडिंग का नाही? शेअर ट्रेडिंग सारखा उत्तम बिजनेस कोणता नाही पण शेअर ट्रेडिंग म्हटलं की लगेच मनात शंका येते अरे त्यात खूप जोखीम आहे आपले कॅपिटल चे नुकसान होऊ शकते. तर मला सांगा असा कोणता बिजनेस आहे त्यात जोखीम नाही सर्व बिजनेस आहेत त्यात जोखीम आहे आता तुमची नोकरी देखील किती दिवस टिकले हे देखील कोण खात्रीशीर सांगू शकत नाही. शेअर बाजारात योग्य प्रकारे काम केले तर आपण आपली जोखीम कमी करू शकतो आणि चांगले प्रॉफिट मिळवू शकतो.
 
 
 
कोणताही व्यवसाय करा सुरवातीला थोडे नुकसान होतेच तसेच व्ययसायात जम बसायला आणि प्रॉफिट व्हायला थोडा वेळ लागतो तसेच शेअर ट्रेडिंग च्या व्यवसायात देखील आहे इथे आपल्याला थोडा वेळ लागेल, मेहनत करावी लागेल तरच आपण ह्या व्ययसायात यशस्वी होऊ शकतो. शेअर ट्रेडिंग म्हणजे झटपट पैसे कमवण्याचा मार्ग नाही पण एक पैसे कमवून देण्याचा उत्तम मार्ग आहे हे नेहमी लक्षता घ्या
 
 
 
शेअर ट्रेडिंग चे फायदे
 
 
शेअर ट्रेडिंग चा सर्वात मोठा फायदा जो मला वाटतो तो म्हणजे शेअर बाजारात तुम्ही कधीही येऊ शकता किंवा कधीही तुमची गुंतवणूक बंद करू शकता म्हणजे इतर व्यवसाय सारखे नाही इथे तुमचे कॅपिटल अडकून नाही ठेवत. आपल्याला हवी तेवढीच गुंतवणूक करू शकतो जर आपल्यला कमी गुंतवणूकी पासून सुरवात करायची असेल तरी देखील आपण हा व्यवसाय करू शकतो. शेअर ट्रेडिंग हे कोणीही करू शकतो ह्या साठी कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाची अट नाही पण शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी ह्याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
'
 
 
तुम्ही शेअर ट्रेडिंग फुल टाईम किंवा पार्ट टाईम म्हणुन करू शकता. तुम्ही तुमचे इतर व्यवसाय किंवा नोकरी सांभाळून देखील शेअर ट्रेडिंग करू शकता. तुम्ही तुमच्या घरात बसून देखील ट्रेडिंग करू शकता किंवा कुठे ही गेलात तरी कुठूनही हा व्यवसाय करू शकता फक्त इंटरनेट आवश्यक आहे. शेअर ट्रेडिंग च्या व्यवसाय मध्ये पारदर्शकता असते इथे उधारी चा प्रश्नच येत नाही जे काही नुकसान किंवा नफा होईल ते त्याच दिवशी आपल्याला समजते व आपल्या खात्यात तसे अपडेट होतात
 
 
 
शेअर ट्रेडिंग चे अनेक फायदे आहेत पण तुम्ही फक्त नुकसान होईल ह्या एका विचाराने शेअर मार्केट गुंतवणूक करत नसाल तर तुम्ही खूप मोठी संधी गमावत आहेत असे मला वाटते. जो पर्यंत तुम्ही सुरवात करत नाहीत तो पर्यंत तुम्हला त्याचा अंदाज येणार नाही . एकदा सुरवात करून तर बघा आणि ह्या बाबत काही मदत लागली तर आम्ही करू आम्हला संपर्क करा
 
 
 
(शेअर बाजारात जोखीम असते आणि जोखीम घेण्याची तयारी असेल तरच शेअर बाजारात गुंतवणूक करावी)
 
 
- नितीलेश पावसकर
 
सेबी रजिस्टर रिसर्च अनलिस्ट
( तनिषा शेअर मार्केट अकॅडमी )
8605168525/7666909157
@@AUTHORINFO_V1@@