'नॉटी' पुरुषांची घाण समाजातून 'फ्लश' करु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2020
Total Views |

Amruta Fadanvis_1 &n
 
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सतत टीका करत आहेत. नुकतेच जागतिक आंतरराष्ट्रीय पुरूष दिवसाचे निमित्त साधत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “नॉटी पुरूषांच्या आचार विचाराची घाण घालवून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करा,” असे आव्हान करत अमृता यांनी राऊत यांना नामोल्लेख टाळत टोला लगावला आहे.
 
 
अमृता फडणवीस यांनी ट्विट केले आहे की, "आज आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस आहे आणि जागतिक शौचालय दिनही आहे. यानिमित्ताने मी देशातील सर्व राष्ट्रभक्त पुरुषांना एक सर्वसामान्य स्त्री म्हणून आवाहन करते की, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही मोजक्या ‘नॉटी’ पुरूषांच्या आचार विचारांची घाण फ्लश करून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करावी."
 
 
मध्यंतरी अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेनेमध्ये वादंग निर्माण झाले असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाला अपशब्द वापरल्याची टीका होत होती. मात्र, संजय राऊत यांनी आपण कंगनाला ‘नॉटी गर्ल म्हणाल्याचे सांगत त्यांनी हरामखोर या शब्दाचा अर्थ सांगितला. यावरून आता अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांना ट्विटरच्या माध्यमांतून टोला लगावला आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@