२६ / ११चा मास्टरमाइंड हाफिज सईदला १० वर्षांची शिक्षा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2020
Total Views |

Hafiz Saeed_1  
 
नवी दिल्ली : टेरर फंडिंगशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिज सईदलाला १० वर्ष ६ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. सईदसह जफर इक्बाल, याहया मुजाहिद आणि अब्दुल रहमान मक्की यांनाही साडे दहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
 
 
हाफिज सईदला कारावासाची शिक्षा सुनावण्याची ही पहिली वेळ नाही. फेब्रुवारी २०२०मध्ये देखील लष्कर ए तोयबाच्या जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला आणि त्याच्या सहकार्‍यांना दहशतवादी कारवायांमध्ये आर्थिक सहाय्य करण्याच्या बाबतीत ११ वर्षांचा तुरूंगवास ठोठावण्यात आला आहे.
 
 
दरम्यान भारताला हाफिज सईद हा २००८ साली झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणी ताब्यात हवा आहे. त्या हल्ल्यामध्ये १० दहशतवादी आणि १६६ निष्पाप जीव मारले गेले होते तर शेकडो लोकं जखमी होते. हाफिज सईद हा अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र यांच्याकडून ग्लोबल टेररिस्ट म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याच्यासाठी १० लाख डॉलरचे बक्षीस देखील घोषित करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये विविध दहशवादविरोधी न्यायालयामध्ये हाफिज सईदवर ४१ विविध केसेस दाखल आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@