'लोकांनी पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडले' ; शिवसेना नेत्याचे धक्कादायक विधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2020
Total Views |

bhaskar jadhav_1 &nb




रत्नागिरी :
लोकांनी पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडले, पोलीसही हप्ते घेतातच ना, असे वक्तव्य माजी मंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई केली होती. भास्कर जाधव यांनी त्यांची पाठराखण करताना पोलिसांवरच शाब्दिक हल्ला चढवला.



भास्कर जाधव यांनी आपल्या गुहागर मतदरासंघातील एका राजकीय कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले. अवैध दारुविक्रीसाठी कारवाई झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याची त्यांनी पाठराखण केली. पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं ? तुम्ही पोलीस हप्ते घेत नाही का ?, असे म्हणत मी तुमच्या पाठीशी आहे असे भास्कर जाधव यांनी जाहीरपणे सांगितले. कोकणातील राजकीय वर्तुळाता त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.भास्कर जाधवांचं हे विधान ८ नोव्हेंबर २०२० रोजीचे आहे. सध्या त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल देखील होत आहे. तसेच फक्त दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका. पहिली म्हणजे मुलींची छेडछाड आणि दुसरी म्हणजे चोरी. 'बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव तुमच्या पाठीशी आहे', अशी पुष्टी देखील यावेळी जाधव जोडली आहे. लॉकडाऊनच्या काळात बाबु सावंत या गुहागरच्या शिवसेना उपतालुकाप्रमुखावर अवैध दारू विक्री प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली होती. यावेळी दारू देखील जप्त करण्यात आली होती. जिल्ह्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली. याच प्रकरणाला धरून भास्कर जाधव यांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? पोलीस हफ्ते घेत नाहीत का? असे विधान केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@