दिवाळी पहाटच्या शेकडो वर्षाच्या परंपरेत खंड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2020
Total Views |

thne_1  H x W:


               
   कोरोनामुळे फडके रोडवर शांतता  महापालिकेच्या आवाहनाला तरूणाईचा सकारत्मक प्रतिसाद




डोंबिवली दि. 14 (प्रतिनिधी)
: पारंपारिक वेशभूषा केलेली तरूणाई, मराठमोळ्य़ा मराठी आणि हिंदी गीतांचा घुमणारा आवाज,गणोशाचे दर्शन घेणारी तरूणाई, आपली कला सादर करण्यासाठी तरूणाईला उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ असे कोणतेच चित्र आज डोंबिवलीतील फडके रस्त्यावर नव्हते. होती ती केवळ शांतता. दिवाळी पहाटची शेकडो वर्षाची परंपरा आज कोरोनामुळे खंड पावली.
 
 


कल्याण डोंबिवली महापालिका आणि पोलिसांनी केलेल्या आवाहानाला सकारत्मक प्रतिसाद देत डोंबिवलीकर तरूणाईंनी कोरोनाला हरविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. फडके रोड आणि दिवाळी पहाटला आनंदोत्सव हे एक समीकरणच झाले आहे. पण फडके रोडवर आज सकाळी कुणीच फिरकले नाही. पोलिसांनी ही रस्त्यावर कोणी फिरकू नये यासाठी कडकोट बंदोबस्त केला होता. पोलिसांतर्फे डोंबिवली शहरातील नागरिकांना फलक लावून दिवाळी पहाटच्या निमित्ताने फडके रोडवर कार्यक्रम होणार नाही. फडके रोड, नेहरू रोड तसेच डोंबिवली शहराच्या अन्य ठिकाणी एकत्रितपणो गर्दी करू नये. मास्कचा वापर करावा अश्या सूचना देण्यात आल्या होत्या. तर कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे ‘हा दीपोत्सव अनोखा टाळू कोरोनाचा धोका’ असे जनजागृती करणारे फलक लावून नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा ही दिल्या आहेत. माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सकाळी गणोशाचे दर्शन घेतले. कोरोनाचे संकट टाळू दे आणि सर्वाना चांगले आरोग्य लाभू दे अशी त्यांनी गणपती बाप्पाला प्रार्थना ही केली.
 
 
 
रविंद्र चव्हाण म्हणाले, दिवाळी पहाट ही मोठय़ा उत्साहात हिंदू सण म्हणून साजरी केली जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतात. गणोशाचे दर्शन घेऊन तरूणाई आपल्या कामाला सिध्दी कशी प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करीत असतात. जमावबंदी कलाम लावल्याने केवळ गणोशांचे दर्शन लांबून घेण्याचे काम तरूणाई करीत आहे.कोरोनामुळे सर्वत्र वाईट परिस्थिती आहे. प्रशासनकडून जमावबंदी कलाम लावले आहे. कोरोनाच्या या सणामुळे केवळ हिंदू समाजाच्या सणावर बंदी आली आहे. इतर समाज आपले सण साजरे करीत होते. हिंदू समाज हा शिस्तबध्द आहे. अयोध्या निर्णय झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आदरणीय सरसंघचालक मोहन भागवत यांनी यांचा उत्सव साजरा न करता आनंदत्सोव साजरा करा. तो आनंदोत्सव शिस्तबध्द पध्दतीने के ला होता. डोंबिवलीकरांनी ही सर्व उत्सव शिस्तबध्द पध्दतीने साजरा करावा.
 
 
डॉ. अरूण नाटेकर यांनी फडके रस्त्यांचे मनोगत व्हाट्स अॅपच्या माध्यमातून मांडले आहे. त्यात फडके रस्ता दिवाळी पहाटला तरी गजबजल असे त्याला वाटत होते. परंतु दिवाळी पहाट पण सुन्नच गेली. असे रिकामपण कुणाच्याही वाटयाला येऊ नये. बाप्पाला सांग हे संकट नष्ट कर आणि असे दिवस परत येऊ देऊ नकोस असे फडके रस्ता नागिराकांना सांगत आहे. डोंबिवलीकर नागरिकांनी तरूणाईच्या समंजसपणाचे कौतुक केले आहे. फडके रस्त्यावरील रहिवाश्यांनी फडके रोडची छायाचित्र फेसबुकवर टाकत तरूणाईंनी हा समंजसपणा दिवाळी होईर्पयत दाखवा असे आवाहान केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@