दिवाळीनिमित्त अक्षय कुमारने केली 'राम सेतू'ची घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2020
Total Views |

Akshay Kumar_1  
मुंबई : दरवर्षी दिवाळीचे निमित्त साधून चित्रपट गृहांमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. अभिनेता अक्षय कुमारदेखील दिवाळीमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे चित्रपटगृह बंद असून एकही नवीन आणि बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. यावर्षी दिवाळीमध्ये चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊ शकले नसले, तरीही अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
 
 
 
 
 
दिवाळीनिमित्त 'राम सेतू' नावाच्या चित्रपटाची घोषणा केली असून, सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनली आहे. 'सत्य कि कल्पना' असे या चित्रपटाचे घोषवाक्य असले तरीही या चित्रपटाबद्दल अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही.
 
 
कोरोनाच्या महामारीमुळे अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आले. अक्षय कुमारचाही 'लक्ष्मी' हा चित्रपट हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. त्यानंतर रोहित शेट्टीसोबतचा 'सूर्यवंशी' हा कोरोना महामारीमुळे पुढे ढकलला आहे. त्यानंतर नुकतेच त्याने 'बेलबॉटम' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. त्यानंतर दिवाळीनिमित्त 'राम सेतू' या चित्रपटाची घोषणा करत पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@