नजर हटी, दुर्घटना घटी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2020   
Total Views |
road safey_1  H

उद्या १५ नोव्हेंबर! हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय रस्ते अपघातग्रस्त दिवस’ म्हणून स्मरण केला जातो. ‘धूम मचाले धूम मचाले धूम’ असे म्हणत वेगमर्यादा ओलांडणारे मोटरसायकलस्वार सगळ्यांचीच डोकेदुखी ठरतात, नव्हे दुचाकी घेणे म्हणजे अपघात होईल की काय, अशी शंकाकुशंका मनात असणारेही बहुसंख्य लोक आहेत.
 
 
याला कराण आहे बेजबाबदारपणे वाहन चालवणारे लोक. ‘अति घाई मरणाकडे नेई’ किंवा ‘नजर हटी दुर्घटना घटी’ असे कितीही लिहिले तरी रस्त्यावर होणारे अपघात थांबत नाहीत. लोक कामानिमित्त प्रवास करतात. अर्थात, प्रवास करतात म्हणजे काम असेल, काही उद्देश असेल, पण खूप घाई केल्याने उद्देश, स्वप्न बाजूला राहतात आणि अपघातामध्ये मृत पावतात.
 
 
 
रस्त्यावरील अपघातांमध्ये बळी जाणार्‍या दुर्दैवी जीवांना श्रद्घांजली म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्मरण करण्याचा दिवस म्हणजे १५ नोव्हेंबर होय. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने मार्च २०१० मध्ये एक ठराव पारित केला. त्यानुसार १५ नोव्हेंबर हा ट्राफिक जाम (वाहतूककोंडी, अपघात) आणि पुढे त्यानुसार अपघातात बळी जाणार्‍यांसाठी स्मरण दिन म्हणून घोषित करण्यात आला. त्यानुसार रस्ते अपघातात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करणे, अपघातग्रस्त स्थितीमधील भीषण वातावरणामध्ये काय भूमिका घ्यावी, याबाबत निष्कर्ष काढणे, जगाचे लक्ष आणि त्या त्या ठिकाणच्या प्रशासनाचे लक्ष रस्ते अपघाताच्या भीषण स्थितीकडे वळवणे, रस्त्यावरील अपघातांमध्ये बळी पडणार्‍या दुर्दैवी लोकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन आणि सर्वतोपरी सहकार्य करणे, रस्ते अपघात कसे टाळता येतील, यावर कार्य करणे इत्यादीचा समावेश आहे.
 
 
संयुक्त राष्ट्राने सांगितले की, जगभरात मृत्युमुखी पडणार्‍यांपैकी सर्वाधिक मृतांची संख्या ही रस्ते अपघातांमध्ये मृत पावणार्‍यांची आहे. यासंदर्भात २०१८ साली जागतिक आरोग्य संघटनेने ‘रस्ता सुरक्षा’ यावर एक जागतिक अहवाल सादर केला. त्यानुसार दरवर्षी १.३५ अब्ज लोक रस्त्यावरील अपघातांत मृत्युमुखी पडतात. त्यामध्येही मागोवा घेतला तर दिसते की, अपघातामध्ये मृत पावणारे हे वय वर्षे ५ ते २९ च्या मधील लोक असतात. याचाच अर्थ की, आयुष्यात भविष्यात काही तरी स्वप्न पाहणारे आणि आणि वर्तमानात स्वप्नांची पूर्ती करू शकणारे या वयोगटातील बालक आणि युवक या रस्ते अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात मृत पावतात.
 
 
जगभरातील प्रत्येक देशात रस्ते अपघातांमध्ये मृत पावणार्‍यांसाठी काही मदत केली जाते. पण, अपघातांमध्ये मृत पावलेल्या व्यक्तीला न्याय मिळतो का? किंवा त्यांच्या कुटुंबीयांना न्याय किंवा मदत मिळते का? तर त्याचे उत्तर आहे की, जगभरात न्याय आणि मदतीसाठी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना वणवण करावीच लागते. जी काही सरकारी मदत मिळणार असते ती मदत मिळवण्यासाठी बळींच्या कुटुंबीयांना लाचलुचपत द्यावीच लागते. अर्थात यात सन्माननीय अपवादही आहेतच.
 
 
हे सगळे लक्षात घेता, जागतिक स्तरावर मानवी मूल्यांचे हक्क संरक्षित व्हावे, यासाठीही पुन्हा संयुक्त राष्ट्र समितीने नवा विचार केला. त्यानुसार मानवी विकासाच्या योजनेमध्ये रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत, यासाठी नियोजन करण्याचा विचार केला गेला. तसेच अपघातामध्ये बळी जाणार्‍यांना हक्क आणि न्याय मिळावेत, यासाठी प्रयोजन केले गेले. त्यानुसार सातत्याने पाठपुरावा केला गेला. मानवी संसाधनांच्या क्षेत्रात काम करणार्‍या अनेक स्वयंसेवी संस्थांनीही यामध्ये योगदान देण्याचे ठरवले. जगभरातील प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने संयुक्त राष्ट्र समितीने एक आराखडा तयार केला.
 
 
त्यानुसार २०२०च्या अंतापर्यंत जगभरातले रस्त्यावरील अपघाती मृत्यू कमी व्हावेत यासाठी काम करण्याचे ठरवले. अपघाती मृत्युदर ५० टक्क्यांवर यावा, असे लक्ष्य आहे. त्यासाठी जगभरात रस्ते अपघातावर जागृती करणे, रस्ते बांधणी आणि नियोजनासाठी मदत करणे, आणि इतरही अनेक उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, दुर्दैव असे की २०२० साल संपत आले आहे आणि रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी झाले नाही. १५ नोव्हेंबर या दिवशी अपघातामध्ये मृत पावणार्‍यांना श्रद्धांजली देऊन, रस्त्यावरील अपघात आपआपल्या क्षेत्रात कमी कसे होतील, याचा विचार आणि नियोजन करुया...



@@AUTHORINFO_V1@@