औरंगाबादमध्ये आश्रमात घुसून महाराजांवर हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2020
Total Views |

Aurangabad_1  H
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील चौका ते लाडसावंगी रस्त्यावर असलेल्या राधा गोविंद सेवा मिशन आश्रमातील प्रियशरण ऊर्फ यादवचंद्र राधाकृष्ण पाराशर महाराज यांच्यावर हल्ला करण्यात आला. काही अज्ञात सात ते आठ लोकांनी मारहाण करता त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्री घडली असून फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
चौका पासून तीन किमी अंतरावर लाडसावंगी रस्त्यावर सताळा गावाच्या हद्दीत उंच डोंगरावर प्रियाशरण महाराज यांचा आश्रम आहे. मंगळवारी मध्यरात्री अज्ञात सात ते आठ व्यक्ती दाखल झाल्या. त्यांनी इमारतीचा मागील दरवाजा तोडून आश्रमात प्रवेश केला. महाराज वरच्या मजल्यावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर या लोकांनी वरच्या मजल्यावर जात महाराज यांना मारहाण केली.
 
 
यामध्ये महाराज आणि त्यांच्यामध्ये झटापट झाली. यात प्रियाशरण महाराज यांच्या डाव्या हाताला चाकूने वार केला गेला. यामध्ये ते जखमी झाले आहेत. त्यांना औरंगाबाद येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अद्याप, त्यांच्यावरील हल्ल्याचे कारण समोर आले नसून पोलिसांनी याबद्दल तपास चालू केला आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@