मुंबई महापालिका मुख्यालयातून शिवभोजन थाळी गायब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2020
Total Views |
shivbhojan_1  H
 
 

महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले होते उद्घाटन

मुंबई : मोठा गाजावाजा करत मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील उपाहारगृहात सुरू करण्यात आलेली `शिवगाळी` गायब झाली आहे. कामगार शिवथाळीची विचारणा करतात. मात्र उपाहारगृह चालक शिवथाळी बंद करण्यात आल्याचे सांगत आहेत. त्यामुळे शिवसेनेचा महत्वकांशी मानला जाणारा 'शिवभोजन थाळी उपक्रम' सत्ता असलेल्या पालिकेतूनच बंद करण्यात आल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
 
 
गोरगरिबांच्या खिशाला परवडणारी शिवथाळी राज्य सरकारने मुंबई महापालिकेतील उपहारगृहातही सुरू केली. पालिका मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या या शिवथाळी योजनेचे एकाच दिवशी काही मिनिटांच्या अंतराने दोनदा उद्घाटन करण्यात आले होते. सुरुवातीला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि नंतर महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
 
 
या थाळीचा आस्वाद जेमतेम महिना-दीड महिनाच कामगारांना घेता आला असेल. त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे उपाहारगृहच बंद झाले. मात्र ऑनलॉकनंतर उपाहारगृह सुरू होताच त्यातून शिवथाळी गायब झाली ती अद्पायपर्यंत. शिवथाळीच्या कमी दरामुळे उपाहारगृह चालकाला भुर्दंड सहन करावा लागत असल्याने उपहारगृहातील मेनूतून 'शिवथाळी' गायब असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि मुंबईत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. घडाळ्याच्या काट्याप्रमाणे धावणारी मुंबई ठप्प झाली. लॉकडाऊनमुळे दुकाने, हॉटेले बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ लागली. मात्र कोणाचीही उपासमार होऊ नये यासाठी राज्यातील सत्ताधारी शिवसेनेने राज्यभरात शिवथाळी योजना सुरु केली. मात्र परवडत नसल्याने मुंबई महापालिकेतील उपाहारगृहातून शिवथाळी योजना गुंडाळली गेली. आज कर्मचारी व अभ्यागत शिवथाळीच्या प्रतीक्षेत आहेत.
 
 
सत्ताधाऱ्यांना स्थायी भोजनाची चिंता
 
 
मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून गरिबांच्या पोटाची भूक भागवणारी शिवथाळी गाजावाजा करत मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहात सुरु केली. या शिवथाळीचे दोन वेळा उद्घाटनही करण्यात आले. परंतु शिवसेनेला गोरगरिबांशी काही देणे-घेणे नाही. त्यांना स्थायी भोजनाचीच फिकीर असते. शिवथाळीच्या नावाखाली ते गोरगरीबांची दिशाभूल करत आहेत. - भालचंद्र शिरसाट, प्रवक्ते, भाजप-मुंबई महापालिका
@@AUTHORINFO_V1@@