ठाणे जिल्ह्यात साथरोग रुग्णालय उभारणार - राजेश टोपे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2020
Total Views |

RAJESH _1  H x
 
 
 
 

कल्याण  : साथीचे रोग निर्माण होतात. त्यावर मात करण्यासाठी मोठी धावपळ करावा लागते. याचा अनुभव कोरोना काळात सगळ्य़ांनाच आला. हे पाहता ठाणे जिल्ह्यात साथ रोग रुग्णालय उभारण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केली आहे. आज केडीएमसी हद्दीतील कोरोनाचा आढावा आरोग्य मंत्री टोपे यांनी घेतला. यावेळी त्यांनी उपरोक्त माहिती दिली. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि महापौर विनिता राणे उपस्थित होत्या.
 
 
आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले की, हे साथ रोग रुग्णालय 1 हजार बेड क्षमतेचे असणार आहे. त्याबरोबर शहरातील रुग्णालयाकरीता आरक्षित असलेल्या प्लाटवर पीपीई तत्वावर रुग्णालये उभारण्यात येतील. कल्याण डोंबिवली महापालिकेने तशा प्रकारचा प्रस्ताव सादर केला आहे. त्याचबरोबर रुग्णालयाला जोडून 500 बेडचे मेडीकल कॉलेज उभारण्याचा प्रस्ताव आहे. ते सुद्धा विकसीत केले जावे.
 
 
कोरोना काळात केंद्राकडून मेडिकल कॉलेजसाठी सहज परवानगी मिळू शकते. केवळ महापालिका हद्दीतच नव्हे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मेडीकल कॉलेज होण्यासाठी पुढाकार घेतला जावा याकडे टोपे यांनी लक्ष वेधले. त्याबरोबर शहरी भागात आरोग्य विभागाकडे लक्ष दिले जात नव्हते. ही बाब कोरोना काळात समोर आल्याने राज्यातील शहरी भागाकरीता एक स्वतंत्र अर्बन आरोग्य संचालनालय सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
 
 
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत एका दिवसाला 600 रुग्ण आढळून येत होते. आजची स्थिती 74 रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण डबलिंगचा दर 300 दिवसांपेक्षा जास्त आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणा पाहता दुसरी लाट आली तरी दिवसाला 900 रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात अशी व्यवस्था करण्यात आली आहे, असे टोपे यांनी सांगितले.
 
कोरोनाच्या दुस:या लाटेबाबत संभ्रम
 
आरोग्यमंत्री टोपे यांनी कडोंमपामध्ये संवाद साधताना कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. डिसेंबरनंतर दुसरी लाट येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तर टोपे यांनी संघटना बळकट करण्यासाठी कार्यकत्र्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाची दुसरी लाट येणार नाही असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री टोपे यांच्यातच कोरोनाच्या दुस:या लाटेबाबत संभ्रम असल्याचे दिसून आले आहे.
 
लवकर मिळणार मुख्य वैद्यकीय अधिकारी..
 
 
महापालिकेची दोन मोठी रुग्णालये कार्यरत आहे. मात्र त्याठिकाणी मुख्य वैद्यकीय अधिकारी नाही. महापालिकेस तातडीने मुख्य वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करुन दिला जाईल. त्याचबरोबर फिजीशियन उपलब्ध करुन दिले जातील अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@