कल्याणमध्ये 'राष्ट्रवादी'त गटबाजी : राजेश टोपे यांच्या कानपिचक्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2020
Total Views |
Rajesh Tope_1  
 
 
 


कल्याण : राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर गटातटाच्या राजकारणामुळे कल्याण-डोंबिवलीत हा पक्ष रसातळाला गेला आहे. निवडणूक डोळ्य़ासमोर ठेवून पक्ष बांधणीसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून मोर्चाबांधणी करण्यास सुरुवात केली. टोपे यांनी कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. कल्याण-डोंबिवलीत पक्ष क्षीण झाला आहे. मात्र सर्वानी सकारत्मक विचार करा. कुणी ही कुणाचे उणी-धुणी काढू नका, असा सज्जड दम टोपे यांनी कार्यकत्र्याना भरला आहे.
 
 
 
"पक्षाचा राजकारणाचा रथ पुढे नेण्यासाठी विकास आणि संघटन ही दोन चाके महत्त्वाची आहे. कार्यकर्ता हा सक्रीय व निष्ठावान असणो गरजेचे आहे. कल्याण-डोंबिवलीत राष्ट्रवादी पक्षाला मानणारा वर्ग आहे. त्या वर्गार्पयत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये संघटन असण्याची गरज आहे. नेतृत्व बळकट उभे केले पाहिजे. कल्याण-डोंबिवलीकडून पक्षाध्यक्षांना खूप अपेक्षा आहेत. त्यासाठी टीम वर्क नी काम होण्याची गरज आहे. एकमेकांचा पाय खेचू नये. पक्षात अंतर्गत गटबाजी नको. कल्याण-डोंबिवलीत पक्ष क्षीण झाला आहे. पण त्याला उभारी देण्यासाठी कार्यकर्त्यांनी खांदयाला खांदा लावून काम केले पाहिजे."
 
"छोटया मोठय़ा चुका होत असतात. पण सगळ्य़ांना पुढे घेऊन जायचे आहे. कोणाच्या मनात काही संभ्रम असण्याची गरज नाही. प्रत्येक सेलचे नेतृत्व करणारा जिल्हाध्यक्ष हवा आहे. कार्यकर्त्यांमध्ये कुरबुरी नको, काम करणाऱ्या प्रत्येकाला संधी मिळतेच. एका ठिकाणी संधी नाही मिळाली तर दुसऱ्या ठिकाणी संधी ही मिळतच असते. काम करणाऱ्यावर कधीही अन्याय होत नाही. त्यामुळे आपल्यावर अन्याय होईल हे प्रथम आपल्या डोक्यातून काढून टाका. कल्याण-डोंबिवलीत टीम वर्क करावे यावर त्यांनी विशेष भर दिला," असे टोपे यांनी कार्यकत्र्याना मार्गदर्शन केले.


@@AUTHORINFO_V1@@