मध्य प्रदेशमध्ये ज्योतिर्रादित्य शिंदेंची बाजी ; भाजप आघाडीवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2020
Total Views |

BJP MP_1  H x W
नवी दिल्ली : एकीकडे बिहार निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष बाजी मारताना दिसत आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेश पोटनिवडणुकीमध्येही भाजपने २८ पैकी १९ जागांवर आघाडी मिळवली असून एका जागेवर विजय मिळवला आहे. मध्य प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीमध्ये ज्योतिर्रादित्य शिंदे यांना जिंकणे गरजेचे होते. तसेच, जनतेनेदेखील त्यांच्यावर विश्वास टाकल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
 
 
 
मध्य प्रदेशमध्ये २८ जागांवर पोटनिवडणूक होत असून, येथील १९ मतदारसंघांमधील जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. तर, काँग्रेसने ७ जागांवर आणि बहुजन समाज पक्षाला एका जागेवर आघाडी मिळाली आहे. मध्य प्रदेशमध्ये सरकार टिकवण्यासाठी भाजपाला किमान ९ ते १० जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. तर काँग्रेसला २८ पैकी २८ जागा जिंकणे आवश्यक आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@