सिडकोच्या विशेष गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2020
Total Views |

cidco_1  H x W:



पोलीसांसाठी ४,४६६ घरांचा प्रकल्प

नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या पोलीस कर्मचाऱ्यांकरिता विशेष गृहनिर्माण योजने अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,४६६ घरांची संगणकीय सोडत मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२० रोजी ७ वा मजला, सिडको सभागृह, सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे दुपारी १२.०० वाजता पार पडली. योजनेची संपूर्ण प्रक्रिया पर्यवेक्षण समितीच्या देखरेखीखाली व सिडकोतर्फे नेमण्यात आलेल्या प्रोबेटी सॉफ्ट प्रा. लि. या कंपनीमार्फत करण्यात आली होती.
 
 
सिडको महामंडळातर्फे पोलीस कर्मचाऱ्यांकरिता एका विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ २७ जुलै २०२० रोजी करण्यात येऊन त्या अंतर्गत ४,४६६ घरे (सदनिका) मुंबई महानगर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकरिता उपलब्ध करून देण्यात आली होती. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
 
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी राज्याला आखून दिलेल्या “सर्वांसाठी घरे” या धोरणांतर्गत सदर योजनेतील सदनिका या आर्थिकदृष्टया दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटात यांसाठी असून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत परवडणाऱ्या घरांची योजना (Affordable Housing Scheme) व सी.एल.एस.एस. (Credit Linked Subsidy Scheme) योजनांतर्गत समाविष्ट आहेत. एकूण ४,४६६ सदनिकांपैकी १,०५७ सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि ३,४०९ या अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत. २७ जुलै २०२० पासून योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली व त्यास २९ ऑक्टोबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
 
अर्जदारांच्या सोयीसाठी सोडतीच्या निकालाचे थेट प्रेक्षपणही करण्यात आले. सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची यादी सिडको महामंडळाच्या https://cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रत्येक योजनानिहाय PDF स्वरुपात लावण्यात आली आहे व एकत्रितरित्या संपूर्ण सोडतीची यादी योजनेचे संकेतस्थळ https://lottery.cidcoindia.com यावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सर्व यशस्वी अर्जदारांकरीता कागदपत्रांची पूर्तता इ. पुढील प्रक्रियांबाबत निवारा केंद्राच्या https://cidco.nivarakendra.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
@@AUTHORINFO_V1@@