अर्णव गोस्वामी अटक : आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली कारागृह अधिक्षकांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2020
Total Views |

prashant thakur_1 &n
 
पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा कारागृह अधिक्षकांची भेट घेतली आहे. अर्णव गोस्वामी यांच्याविषयी महाराष्ट्रभर चिंता व्यक्त केल्या जात होत्या. त्याअनुषंगाने ही भेट घेण्यात आल्याचे समजते. रिपब्लिकच्या अन्य काही अधिकाऱ्यांची मंगळवारी सकाळी अटक झाल्याची माहिती देण्यात आली.
 
 
पनवेलचे आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी तळोजा कारागृह अधीक्षकांची मंगळवारी भेट दुपारी साडेबारा वाजता भेट घेतली. अर्णव गोस्वामी यांच्या सुरक्षिततेविषयी त्यांना तळोजा कारागृहात हलविल्यापासून चिंता व्यक्त केल्या जात आहेत. प्रशांत ठाकूर ज्या विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात त्या पनवेलमध्ये तळोजा कारागृह आहे.
 
 
अर्णव गोस्वामी यांची रवानगी रविवारी सकाळी अचानक अलिबागहुन तळोजा कारागृहात करण्यात आली. त्यांना घेऊन येत असताना पोलिसांनी वाहनाला काळे पडदे लावले होते. ठाकरे सरकारच्या या अमानुष कृतीवर देश-विदेशातून संताप व्यक्त केला जात होता. तसेच अर्णव यांच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त करण्यात येत होत्या. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास तळोजा कारागृह अधिक्षकांची भेट घेतली आहे. सकाळी रिपब्लिकचे उपाध्यक्ष तसेच वितरणप्रमुखालादेखील अटक झाल्याचे समजते. त्यांची अटक टीआरपी प्रकरणात करण्यात आली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@