इथे पैसे कमावणाऱ्यांना हरामखोर म्हटले जाणार नाही ! राऊतांना टोला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Nov-2020
Total Views |
Kangna_1  H x W

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतला संजय राऊत यांनी ‘हरामखोर’ म्हटल्यांनंतर दोन्ही बाजूंनी यावर टीका टीपण्णी झाली होती. कंगनाने आता आणखी एकदा शिवसेना खासदार संजय राऊतांना नाव न घेता चिमटा काढला आहे. “हिमाचल प्रदेशमध्ये ‘भूत पुलिस’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. देव भूमी प्रत्येकाची आहे. कुणी इथून पैसे कमावत असेल तर त्याला ‘नमकहराम’ किंवा ‘हरामखोर’ म्हटले जाणार नाही, कुणी म्हणेल त्यांची मी निंदा करते. बॉलीवुडप्रमाणे गप्प बसणार नाही.”
 
 
 
कंगनाने एक लेख फेसबूक पोस्ट करत शिवसेनेला चिमटा काढला आहे. कंगना रणौत हिने सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून बॉलीवुडच्या शांत बसण्यावर टीका केली होती. त्यानंतर मुंबई पोलीसांनी या प्रकरणी योग्य तपास लावला नाही, असे म्हणत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. याविरोधात संजय राऊत आणि शिवसेनेने आवाज उठवला होता. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत कंगनाला हरामखोर, असे म्हणाले होते. याच वेळी कंगनाच्या कार्यालयावर पालिकेने कारवाई केली होती. या प्रकरणानंतर संजय राऊत आणि शिवसेनेला टीकेचा सामना करावा लागला होता.
 
 
कुठे सुरू आहे भूत पुलिस चित्रपटाचे चित्रीकरण
 
पवन कृपलानी दिग्दर्शित भयपट आणि विनोदी असलेल्या भूत पुलीस या चित्रपटाचे चित्रीकरण हिमाचल प्रदेशातील डलहौसी येथे सुरू आहे. त्यासाठी कलाकार सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलीन फर्नांडीस, यामी गौतम आणि निर्माते रमेश तौरानी आणि अक्षय राय या ठिकाणी दाखल झाले आहेत. हे सर्वजण हिमाचलमध्ये आल्यानंतर कंगनाने राऊतांना डिवचण्यासाठी हा खोचक टोला लगावला.



@@AUTHORINFO_V1@@