उदयोन्मुख कलासागर : सागर कांबळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2020
Total Views |

artist sagar kamble _1&nb


आज भारतामध्ये महत्त्वाचे तीन विषय फार उग्र रुप धारण करुन भेडसावत आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या, महिला अत्याचार आणि अनेक वर्षे पडून राहिलेला देवदासींचा प्रश्न... या अत्यंत संवेदनशील विषयांना रंगाकारांच्या माध्यमातून जाणकारांचे-संबंधितांचे आणि समाजाचे लक्ष वेधून घेता यावे, या उद्देशाने चित्रकार सागर कांबळे यांनी कलाकृती साकारताना रंगभावनांना वाट मोकळी करुन दिलेली आहे.


‘ललित कला अकादमी’च्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राचे तरुण चित्रकार सागर वसंत कांबळे यांना २०२० सालचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या कलाकृती पाहून तसा अंदाज जाणकारांना आला होताच. रंगलेपन, आकार, चित्रविषय आणि संदर्भ यांच्या सुनियोजित संकल्पनांतून सागर कांबळे यांची कलाकृती साकारते. सागर हे फारच सूक्ष्म विचार करुन चित्रविषय निश्चित करतात. चिंतनातून निर्माण होणारं सृजन हे स्मृतिप्रवण असतं. कलाकार हा वयाने नव्हे, तर त्याच्या प्रतिभाशक्तीने मापला जातो. अमुक एक तरुण आहे, कमी वयाचा आहे म्हणून म्हणून त्याची कलानिर्मिती लहान ठरत नाही. हेच सागर यांच्या कलाकृती पाहताना ध्यानी येतं. कलाकाराचा ब्रशचा फटकारा, रंगलेपनातील कौशल्यपपूर्ण रचना आणि कलाकृतीच्या विषयानुरुप मांडणी या तीन सूत्रांवर कलाकृती कलारसिकांसाठी पर्वणी ठरतात. तरुण चित्रकार सागर वसंत कांबळे यांच्या कलाकृती या प्रामाणिक प्रयत्नातून बनलेल्या भासतात. चित्रकार सागर कांबळे यांनी विशिष्ट विचार चिंतनातून कलाकृती सादर करताना भारतीय पारंपरिक, संवेदनशील आणि स्वतंत्र विचारांचा मिलाफ केलेला पाहायला मिळतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात विविध प्रकारच्या विचारप्रवाहांची देवाणघेवाण सुरु झालेली होती. कलाक्षेत्रही या बदलाला अपवाद नव्हते. मग पाश्चिमात्य कलाकारांचा आपल्यावर परिणाम झाला. आपल्या समकालीन कलाकारांच्या शैली व तंत्रांवर पाश्चात्य शैली प्रकारांचा हवा तो परिणाम झाला. चित्रकार सागर यांनी या बदलाकडे पाहताना, स्वतःच्या शैली व तंत्रांवर प्रभाव पडणार नाही, अशी काळजी घेतलेली दिसते. अनुकरणप्रिय विचारांना त्यांनी दूर ठेवले. भारतीय ग्रामीण तसेच पारंपरिक जीवनात डोकावले तर आपल्याला कलाकृती निर्माणासाठी अनेक विषय हे चित्रविषय म्हणून मिळू शकतात, हे सागर यांच्या कलाकृतींवरुन ध्यानी येते.

artist sagar kamble _1&nb

आज भारतामध्ये महत्त्वाचे तीन विषय फार उग्र रुप धारण करुन भेडसावत आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या, महिला अत्याचार आणि अनेक वर्षे पडून राहिलेला देवदासींचा प्रश्न... या अत्यंत संवेदनशील विषयांना रंगाकारांच्या माध्यमातून जाणकारांचे-संबंधितांचे आणि समाजाचे लक्ष वेधून घेता यावे, या उद्देशाने चित्रकार सागर कांबळे यांनी कलाकृती साकारताना रंगभावनांना वाट मोकळी करुन दिलेली आहे. कलाकार संवेदनशील असतो असे जे सांगितले जाते, त्याचे उत्तम म्हणजे सागराएवढी आशयगर्भता लाभलेली कांबळे यांची पेंटिंग्ज होय. कलापूर अर्थात कोल्हापूरच्या कलानिकेतन येथून एटीडीचं कलाशिक्षण घेऊन मुंबईच्या सर जे. जे. स्कूलमध्ये बीएफए पेंटिंग आणि पुढे एमएफए क्रिएटिव्ह पेंटिंग या पदव्या त्यांनी प्रथम श्रेणीत पूर्ण केल्या. कलेकडे विशिष्ट चाकोरीतून न पाहता एका अभिव्यक्तीचं मूर्तिमंत रुप म्हणून पाहणारा कलावंत त्याच्या कल्पनाविष्कारांना समर्पक रंगाकारांद्वारे व्यक्त करतो, असे कलावंत फार कमी असतात. त्यापैकी एक म्हणजे सागर कांबळे होय. चित्रकार सागर कांबळे यांना नुकताच ललित कलेचा राष्ट्रीय स्तरांवरील पुरस्कार मिळाला तत्पूर्वी बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या पुरस्कारांसह एकंदर २६-२७पुरस्कारांनी कांबळेंच्या कलाकृतींना मान मिळालेला आहे. एकंदर सात समूह प्रदर्शनांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला असून तेराहून अधिक कार्यशाळा आणि चर्चासत्रांमध्ये कांबळे यांनी सहभाग घेतलेला आहे. त्यांच्या कलाकृती विविध प्रतिष्ठित संग्राहकांकडे सन्मानपूर्वक संग्रही आहेत. त्यांच्या कलाविषयक प्रवासाचा मर्म यशस्वी राहावा, यासाठी त्यांना शुभेच्छा...!


- प्रा. गजानन शेपाळ
@@AUTHORINFO_V1@@