क्षेपणास्त्र चाचणीत ‘रुद्रम’चा रुद्रावतार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2020
Total Views |
Rudram_1  H x W



संरक्षण क्षेत्रात भारत ‘आत्मनिर्भर’

नवी दिल्ली : डीआरडीओतर्फे आता पुन्हा एकदा इतिहास रचण्यात आला आहे. भारतातर्फे शुक्रवारी अँटी रेडीएशन मिसाईल रुद्रम या क्षेपणास्त्राचे सफल परिक्षण केले आहे. डीआरडीओद्वारे तयार करण्यात आलेल्या रुद्रम क्षेपणास्त्राची सुखोई-३०द्वारे चाचणी करण्यात आली आहे. संपूर्ण स्वदेशी बनावटीचे असलेले रुद्रम क्षेपणास्त्र कितीही उंचावर डागले जाऊ शकते. तसेच कुठल्याही प्रकारच्या सिग्नल तसेच रेडीएशन पकडण्यासाठी योग्य आहे. तसेच आपल्या रडारमध्ये रेडीएशन घेऊन नष्टही करू शकते.
 
 
अद्यापही या क्षेपणास्त्रात बदल अपेक्षित आहेत. विकसित करण्याच्या दृष्टीने आता याची चाचणी करण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राला सुखोई आणि तेजस या दोन्ही लढाऊ विमानांमध्ये वापरले जाऊ शकते. या आठवड्याच्या सुरुवातीलाच डीआरडीओने सुपरसोनिक मिसाइल असिस्टेड रिलीज़ ऑफ टॉरपीडो (SMART) या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. डीआरडीओतर्फे ओदीशाच्या समुद्र किनारी असलेल्या तटावर याचे यशस्वी परीक्षण केले होते. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर बनण्याचे उद्दीष्ट्य ठेवले आहे. त्यादृष्टीने डीआरडीओचे महत्वाचे पाऊल आहे.






@@AUTHORINFO_V1@@