कोरेगाव भीमा प्रकरणात फादर स्टॅन स्वामी अटकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2020
Total Views |

father_1  H x W

 
 
 
नवी दिल्ली : कोरेगाव–भीमा अत्याचार प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआए) मोठी कारवाई केली आहे. ८३ वर्षीय फादर स्टॅन स्वामी यांना झारखंडहून अटक करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात एनआयएच्या एका पथकाने गुरुवारी नामकुम स्थानक परिसरातून फादर स्टीन स्वामी यांना अटक केली. त्यांच्या घरातूनच त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची तिथेच २० मिनिटे चौकशी करण्यात आली. त्यांचा ख्रिस्ती धर्मांतरण चळवळींमध्ये सक्रीय सहभाग आहे.  
 
 
शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. १ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील कोरेगाव-भीमा गावात दोन समाजामध्ये हिंसा भडकली होती. त्या प्रकरणात फादर यांना अटक करण्यात आली आहे. केरळचे मूळ निवासी असणारे फादर स्टेन स्वामीगेल्या पाच दशकांहून अधिक काळ झारखंडमध्ये आहेत, त्यामुळे तिथून या अटकेचा विरोध केला जात आहे. फादर स्वांनींना रिमांडवर घेतले जाऊ शकते त्यानंतर ट्रान्झिट रिमांडवर त्यांना दिल्लीला आणले जाऊ शकते. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, माओवादाशी संबंध असल्याने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही त्यांची चौकशी करण्यात आली होती.
 
 
 
नेमके प्रकरण काय ?
 
पुण्याहून ४० किमी दूर असलेल्या कोरेगाव-भीमा गावात १ जानेवारी २०१८ रोजी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचा काही दक्षिणपंथी संघटनांनी विरोध केला. एल्गार परिषद संमेलनादरम्यान, एक हिंसा भडकली होती. त्यानंतर लागलेल्या वाहनांमध्ये आग लावण्यात आली. दुकाने आणि घरांची जाळपोळ करण्यात आली. एकाचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. या प्रकरणात गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या विरोधात माओवाद्यांशी कथित संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली कारवाई करण्यात आली आहे.
 
 
 


@@AUTHORINFO_V1@@