करमुसे मारहाण प्रकरण : मुख्य सुत्रधाराला अटक झालीच पाहिजे !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2020
Total Views |
Anant Karmuse_1 &nbs


मुख्य सुत्रधाराच्या अटकेसह आरोपी पोलीसांच्या निलंबनाची भाजपची मागणी

 
ठाणे : ठाण्यातील अभियंता अनंत करमुसे यांना महाविकास आघाडीतील एका मंत्र्याच्या निवासस्थानी झालेल्या मारहाणीप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी मंत्र्याचा स्वीय सहाय्यक व तीन अंगरक्षकांसह सहा कार्यकर्त्याना अटक केली. मात्र, या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार मोकाट असुन त्याला अटक करावी. तसेच, अटक पोलिसांचे तत्काळ निलंबन करून चौकशी करावी. या मागणीसाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानुसार, शुक्रवारी भाजप नेते किरीट सोमय्या, भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आ. निरंजन डावखरे, नगरसेवक मनोहर डुंबरे आदींनी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन निवेदन सुपूर्द केले.
 
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला होता. त्याविरोधात ठाण्यातील कासारवडवली येथील अनंत करमुसे या तरूणाने सोशल मीडियावर आव्हाड यांच्यासंदर्भात पोस्ट टाकली होती.त्याच मध्यरात्री साध्या व गणवेषातील पोलिसांनी घरातुन उचलून आणुन आव्हाड यांच्या बंगल्यात बेदम मारहाण केल्याची तक्रार पिडीत तरूणाने वर्तकनगर पोलिसात केली होती. मारहाण होत असताना आव्हाड उपस्थित असल्याचा आरोपही करमुसे यांनी केला होता. या मारहाणीचे पडसाद प्रसारमाध्यमांसह सोशल मिडीयात व राजकिय वर्तुळात उमटल्यानंतर आव्हाड यांच्यावर टिकेची झोड उठली.
 
 
त्यानंतर पोलिसांनी मंत्री आव्हाड यांच्या स्वीय सहायकासह सहा कार्यकर्त्याना अटक केली तर, तब्बल ६ महिन्यांनी ( ५ ऑक्टो.) या मारहाण प्रकरणाशी संबधित असलेल्या तीन पोलिसांना अटक केली होती. मात्र,मुख्य सुत्रधार मोकाट असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत साशंकता व्यक्त होत आहे. दरम्यान,मुख्य सूत्रधाराला अटक तसेच, अटक पोलिसांचे निलंबन करून चौकशी करावी. अशा मागणीचे निवेदन भाजपने पोलीस आयुक्तांना दिले. यावेळी किरीट सोमय्यानी, ठाकरे सरकार व गृहमंत्री अनिल देशमुख मंत्री आव्हाड यांना वाचवायचा प्रयत्न करीत आहे.त्यामुळेच, करमुसे प्रकरणात आव्हाड यांचे नाव एफआयआरमध्ये समाविष्ट केलेले नसल्याचा आरोप केला.तसेच केवळ आव्हाडच नव्हे,तर, शिवसेनेचे अनिल परब व महापौर किशोरी पेडणेकर यांनाही लवकरच गजाआड व्हावे लागेल.असेही सोमय्या म्हणाले.



 
@@AUTHORINFO_V1@@