"सरकारने आता मराठा समाजाची परीक्षा पाहू नये”

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2020
Total Views |

UdayanRaje Bhosale_1 
 
 
मुंबई : मराठा आरक्षण, त्याच्यावर आलेली स्थगिती आणि महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या परीक्षा यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय होईपर्यंत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. मराठा समाजाची परीक्षा बघू नये, आमच्या प्रश्नांवर तोगडा काढावा असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.
 
 
 
 
 
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबुक पोस्ट करून हे आवाहन केले आहे. “महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली. तरीही सरकारने ११ ऑक्‍टोबरलाच परीक्षा घेण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला. एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असताना तसेच मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आलेला असतानासुद्धा सरकारला एमपीएससी परीक्षा घेण्याची एवढी घाई का?
  
 
 
“जर सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तात्काळ घेतला नाही तर त्याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील. मराठा समाज हा जितका संयमी आहे, तितकाच तो आक्रमकही आहे. याची जाणीव ठेवून सरकारने एमपीएससीच्या परीक्षेसाठी संपूर्ण मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नये.” असा इशारा त्यांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले आहेत की, “येत्या ११ तारखेला एमपीएससीची परीक्षा घेतल्यास मराठा तरुणांचे न भरून येणारे मोठे नुकसान होणार आहे. तरीही सरकारने ही परीक्षा घेण्याची अन्यायकारक भूमिका घेतली. मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर लगेच १५००० जागा भरण्याची सरकारला एवढी घाई का? आरक्षणाच्या स्थगितीमुळे मराठा समाजात प्रचंड मोठा संताप निर्माण झाला आहे. तरीसुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार करत आहे.”
 
@@AUTHORINFO_V1@@