''तृणमुल'च्या गुंडानी भाजप कार्यकर्त्यांच्या छातीवर फेकले बॉम्ब'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2020
Total Views |
Tejaswi Surya_1 &nbs
 
 


फॅसिझम म्हणजे आणखी काय : तेजस्वी सुर्या


कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या रॅलीवर हल्ला झाला. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कर्नाटकचे खासदार तेजस्वी सुर्या यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. शांततेत सुरू असलेल्या या मोर्चावर तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशी बॉम्ब फेकले. नवन्नो चलो या आंदोलनाविरोधात पोलीसांनी लाठीमार केलाच परंतू तृणमुलच्या गुंडांनी आमच्या छातीवर बॉम्ब फेकले, असा आरोप केला आहे.
 
 
 
 
तेजस्वी सूर्या म्हणतात, "फॅसिझम म्हणजे दुसरे काय असते. तृणमुल काँग्रेसच्या गुंडांनी आमच्यावर हल्ला केला. पोलीसांनी आमच्या शांततेत सुरू असलेल्या रॅलीवर अश्रुधूर सोडला. वॉटर कॅनलद्वारे हटवण्याचा प्रयत्न केला. अशा दहशतीच्या राजकारणाचा अंत जवळ आला आहे. हे आता निश्चित जनतेला या गुलामगिरीतुन मुक्तता हवी आहे."
 
 
 
 
बंगालमध्ये भाजपचे नेते मनीष शुल्का यांची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर स्थानिकांमध्ये रोष दिसून येत होता. भाजपनेही याविरोधात ममता सरकारला जाब विचारला आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राग आहे. तेजस्वी सुर्या बंगालमध्ये पोहोचले. त्यांनी नवन्नो चलो रॅली काढली. समर्थसांसह राज्य सचिवालय नवन्नाकडे ते जात होते.
 
 


 
 
त्याचवेळी आलेल्या तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला केला, असा आरोप त्यांनी केला आहे. सोशल मीडियावर दिवसभर याबद्दल तणाव दिसून आला होता. भाजप कार्यकत्यांवर केलेल्या अमानुष लाठीमाराचे व्हीडिओ दिवसभर व्हायरल होत होते. अश्रुधूर आणि पाण्याच्या फवारा सोडून कार्यकर्त्यांना मागे हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला.






@@AUTHORINFO_V1@@