जाहिरात क्षेत्रातील आयडियांची कल्पना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2020
Total Views |

vicharvimarsh_1 &nbs


व्यवसाय-ग्राहकांच्या गरजांनुरूप जाहिरात संकल्पनांची कल्पक मांडणी करण्यासाठी, जाहिरात कंपन्या परंपरागतरीत्या इतरांवर प्रामुख्याने अवलंबून असत. आता मात्र बदलत्या गरजा, स्पर्धात्मक काळानुरूप आपल्याच कर्मचार्‍यांच्या कल्पनाशक्ती आणि आकलनशक्तीला कसे प्रोत्साहन देत आहेत, त्याचाच हा कानोसा...


केवळ मार्केटिंग-व्यवस्थापनच नव्हे, तर एकूणच व्यावसायिक संदर्भात जाहिरात व्यवसायाचे विशेष महत्त्व सर्वमान्य आहे. सततच्या कल्पक व नावीन्याला प्रगत व अद्ययावततेची देण्यात आलेली साथ व त्यानुरूप विषय-आशयाची नेमकी मांडणी प्रभावीपणे करणे, ही बाब जाहिरात संस्थांसाठी नेहमीच महत्त्वपूर्ण ठरते. आपल्या या कल्पक गरजांची पूर्तता करण्यासाठी व्यवसाय-ग्राहकांच्या गरजांनुरूप जाहिरात संकल्पनांची कल्पक मांडणी करण्यासाठी, जाहिरात कंपन्या परंपरागतरीत्या इतरांवर प्रामुख्याने अवलंबून असत. आता मात्र बदलत्या गरजा, स्पर्धात्मक काळानुरूप आपल्याच कर्मचार्‍यांच्या कल्पनाशक्ती आणि आकलनशक्तीला कसे प्रोत्साहन देत आहेत, त्याचाच हा कानोसा...जाहिरात क्षेत्रातील वाढती स्पर्धा, वाढता चोखंदळपणा, विविध पर्यायांची उपलब्धता यासंदर्भात जाहिरातदारांच्या अपेक्षा पूर्ण करताना जाहिरात एजन्सीला आपली कामगिरी सिद्ध करण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. यामध्ये जाहिरात एजन्सी व संबंधित ग्राहक-कंपनी यांचे परस्पर संबंध व्यावहारिकच नव्हे, तर व्यावसायिक संदर्भातदेखील महत्त्वाचे ठरतात.


जाहिरातदारांच्या गरजांनुरूप जाहिरात एजन्सीला वेळेत व वेळोवेळी कल्पक कल्पना सुचविण्यासाठी बंगळुरू येथील ‘डुंझो’ स्टार्टअप विशेष उल्लेखनीय स्वरूपात कार्यरत आहे. यासाठी ‘डुंझो’ने कल्पक कर्मचार्‍यांची विशेष नेमणूक केली आहे. या कर्मचार्‍यांच्या कामगिरीमध्ये प्रामुख्याने विविध विषयांवर आधारित जाहिरात संकल्पनांवर काम करणे व त्यानुरूप जाहिरात एजन्सीला पर्याय सुचविणे, याचा कल्पक समावेश असतो. या कामाचा फायदा अर्थातच जाहिरात एजन्सीला होऊन त्यांना मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करणे सुलभ होते. याशिवाय ‘डुंझो’ने आता काही निवडक जाहिरात एजन्सींसाठीच नव्हे, तर थेट त्यांच्या ग्राहक-जाहिरातदारांसाठीही काम करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये विविध एजन्सीसाठी ग्राहकांच्या जाहिरातविषयक गरजा समजून घेणे, त्यांच्यासाठी छायाचित्रणात सहभागी होणे, कल्पक कामांचे सादरीकरण करणे, प्रसिद्धी उपक्रम राबविणे, सामाजिक संवाद साधून देणे, समाजमाध्यमांवरील संवादाची नोंद व दखल घेणे इत्यादीचा समावेश असतो. अनेक जाहिरात एजन्सीसाठी थोडे-थोडे काम सातत्याने मिळाल्याने या नव्या स्टार्टअपने अल्पावधीतच आपले बस्तान बसविले आहे. ‘डुंझो’च्या जाहिरातदारांच्या नामावलीत ‘पेपरबोट’, ‘बुकमाय-शो’, ‘स्विगी’ यांसारख्या प्रस्थापितांचा अल्पावधीतच समावेश झाल्याने त्यांच्या कारकिर्दीच्या यशस्वी सुरुवातीची कल्पना येते. यातच आता ‘झोमॅटो’ची भर पडली व याद्वारे ‘डुंझो’ने संगणकीय पद्धतीवर आधारित अशा डिजिटल मार्केटिंग या व्यवसाय संकल्पनेलाच नवा आयामही दिला.


या नव्या जाहिरातकलेमुळे ग्राहक-व्यावसायिक, जाहिरातदार व त्यांच्यासाठी काम करणार्‍या छोटेखानी स्वरूपाच्या, पण महत्त्वपूर्ण अशा स्टार्टअप संस्था या संयुक्तपणे व परस्पर पूरक स्वरूपात निश्चितपणे काम करू शकतात, ही बाब आता स्पष्ट झाली आहे. या नव्य उपक्रमामुळे जाहिरात एजन्सीच्या कल्पक मांडणीला नव्या कल्पना व नावीन्यतेची जोड मिळाली. याशिवाय जाहिरातदाराला आधीच्या तुलनेत कमी वेळात विविध स्वरूपात मांडणीसह मजकूर मिळत असल्याने सर्वांच्याच व्यवसायवाढीला त्याचा फायदा झालेला दिसून येतो. या नव्या प्रयत्नांमुळे विविध माध्यमांवरील जाहिरातदारांच्या गरजांची पूर्तता कशी परिणामकारक पद्धतीने होऊ शकते, यासंदर्भातील एक प्रमुख व ताजे उदाहरण म्हणून ‘बुकमाय शो’च्या जाहिरातींचा उल्लेख करावा लागेल. कंपनीच्या ग्राहकांमध्ये बहुविध स्वरूपातील व्यक्ती-गटांचा समावेश असतो. त्यांच्यापर्यंत नेमके व थेट पोहोचण्यासाठी समाजमाध्यमे, जाहिराती, संगणकीय माध्यमे व मुख्य म्हणजे व्यवसाय चिन्हांचा उचित उपयोग करून घेणे आवश्यक व आव्हानपर असते. हे सारे जुळवून आणण्यासाठी जाहिरात एजन्सीला आता विविध विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांची समर्थ साथ मिळू लागली आहे.



याच्याच जोडीला काही जाहिरात कंपन्या विविध वाचक व नावीन्यपूर्ण जाहिरात संकल्पना शोधून काढण्यासाठी आपल्याच कर्मचार्‍यांना प्रेरित-प्रोत्साहित करीत आहेत. यासंदर्भातील ‘स्विगी’ कंपनीतील उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतो. त्यासाठी ग्राहकांच्या अपेक्षा आणि अनुभवांवर आधारित कथा चित्रित करण्यात आली. ‘स्विगी’ कर्मचार्‍यांनी आपसातच चर्चा व विचार-विनिमय करून त्याला अंतिम स्वरूप दिले व त्यातूनच ‘नावात काय आहे?’ ही जाहिरात साकारली. गेल्या सहा महिन्यांत दोन कोटींहून अधिक लोकांनी ही जाहिरात पाहिल्याने ‘स्विगी’च्या या उपक्रमावर यशाचे शिक्कामोर्तब झाले आहे. हीच बाब आपल्याला मुंबईच्या ‘स्प्रिंग मार्केटिंग कॅपिटल’ या आर्थिक व्यवहार-गुंतवणूक विषयक कंपनीच्या जाहिरातींच्या संदर्भात पाहायला मिळते. कंपनीने आजवर १२ प्रकारच्या जाहिरातींची मूळ संकल्पना ही कंपनीच्या १२ प्रवर्तकांनी मोठ्या कल्पकतेने साकारली व एकजात सर्व जाहिराती व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरल्या. आज या क्षेत्रातील विशेषतः आर्थिक गुंतवणूक करणार्‍या कंपन्या आपल्या आर्थिक सेवा आणि उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी मूळ संकल्पना अधिकाधिक आकर्षक बनविण्यासाठी ‘स्प्रिंग मार्केटिंग’लाच प्रथम पसंती देताना दिसतात.


अशाच प्रकारचा उपक्रम मोेठ्या प्रमाणावर अमलात आणला आहे तो ‘अ‍ॅमेझॉन’ कंपनीने. जागतिक स्तरावर कार्यरत असणार्‍या ‘अ‍ॅमेझॉन’ने त्यांच्या वाढत्या व्यापार-व्यवहारानुरूप जागतिक स्तरावर सुमारे तीन हजार कर्मचार्‍यांची आपल्या कंपनीच्या जाहिरात मजकुरांसाठी ‘कल्पक आयडियाची’ कल्पना शोधण्यासाठी नेमणूक केली असून, त्यातील ३५० कर्मचारी ‘अ‍ॅमेझॉन’साठी भारतात कार्यरत आहेत.‘अ‍ॅमेझॉन’च्या जाहिरातींच्या कल्पक कल्पना सुचविण्यासाठी अंतर्गत कर्मचार्‍यांच्या कल्पनाशक्तीला प्राधान्य दिले जात असतानाच, काही विशेष प्रसंगी बाहेरच्या जाहिरात एजन्सींचा उपयोग केला जातो. अशा प्रयोगाद्वारे कंपनीच्या जाहिरातींमध्ये वेगळेपणा व विविधता साधली जाते, असा अनुभव ‘अ‍ॅमेझॉन’च्या व्यवस्थापनाला आला आहे. विशेषत: कोरोना कालखंडात कंपनीचे अधिकांश कर्मचारी घरून काम करीत असताना, या उपक्रमाचा प्रभावशाली उपयोग केला गेला, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.


जाहिरात संस्थांनी आपल्या कर्मचार्‍यांच्या कल्पनाशक्ती व कृतिशीलतेला कल्पक वाव देण्याच्या या उपक्रमांमुळे एकीकडे कर्मचार्‍यांच्या कृतिशीलतेला वाव मिळतो, तर त्याचवेळी अशा कर्मचार्‍यांच्या जाहिरात संकल्पनांना संबंधित जाहिरातदारांकडून मान्यता मिळाल्यास, त्यांना काही प्रोत्साहनपर राशीवजा पुरस्कारही प्रदान केले जातात. या जाहिरात उपक्रमाला ‘पेपरबोट’ बॅ्रण्डची कल्पक निर्मिती करणार्‍या ‘हेक्टर बेवरेजेस’ कंपनीमध्ये विशेष यश आणि प्रतिसाद लाभला आहे. जाहिरात व्यवस्थापनाच्या परंपरागत व प्रचलित पद्धतीला सोडून नव्या कल्पक पद्धतीचा अवलंब करताना, विकसित संगणकीय कार्यपद्धती व ऑनलाईन पद्धतीचा मोठा लाभ सर्वांनाच झालेला आहे. यामुळे प्रयत्न आणि वेळेची बचत तर झालीच, शिवाय मोठ्या प्रमाणावर कल्पकता आणि नावीन्याला वाव मिळून, असे उपक्रम व्यवसायपूरक ठरले आहेत. नव्या उपक्रमाची नवी नांदी नव्या संदर्भात फलदायी ठरली आहे.


- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर आणि व्यवस्थापन सल्लागार आहेत. )
@@AUTHORINFO_V1@@