मुंबई पोलीस आयुक्तांना कोर्टात खेचणार : अर्णब गोस्वामी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2020
Total Views |
arnab_1  H x W:
 
 

माझ्या स्टुडीओमध्ये चर्चेसाठी या परमवीर सिंह यांना अर्णब यांचे खुले आव्हान



मुंबई : अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टिव्ही विरोधात टीआरपी छेडछाडीचा आरोप करत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी फेसबूक लाईव्ह करत या प्रकरणी उत्तर दिले आहे. माझा चॅनल बंद करून दाखवाच असे खुले आव्हान, त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना केले आहे. माझ्या नावाची बदनामी केल्याप्रकरणी मानहानीचा खटला दाखल करून कोर्टात खेचणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
 
 
 
अर्णब म्हणाले, "उद्धव ठाकरे तुम्ही माझ्या आवाजाला घाबरलात का ?, आम्ही करत असलेल्या वार्तांकनाला मुंबई पोलीस आयुक्त घाबरले आहेत का ?, आम्ही स्वतः मेहनतीने उभ्या केलेल्या या वृत्तसंस्थेला तुम्ही चोरीचा किंवा ठग असल्याचा आरोप करता याचे उत्तर तुम्हाला न्यायालयात द्यावे लागेल. मी यापुढे सुशांत सिंह प्रकरण असेल, पालघर साधू हत्याकांड प्रकरण असेल किंवा हाथरस प्रकरणात उधळून लावलेल्या दंगलीच्या कटाबद्दलचे प्रकरण असेल या सर्व प्रश्न विचारणाऱ्यांना मी उत्तर देईन."
 
 
 
'देशातील एका पत्रकाराचा आवाज दाबणार आहे का ?, सुशांत सिंह प्रकरणात आपण आणखी मोठी लढाई उभारू, यासाठी मला जनतेच्या मदतीची गरज आहे. मुंबई पोलीसांना पत्रकार परिषद घेण्यासाठी वरून दबाव आला होता का', असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. लोक आमचा चॅनल पाहतात, त्यामुळे आमचा टीआरपी वाढला आहे, इतक्या वर्षांत मेहनतीने उभे केलेले तो खोटा टीआरपी आहे का ?, असा प्रश्न विचारला आहे.



टीआरपी प्रकरणात 'बार्क' या संस्थेने अद्याप रिपब्लिक टिव्हीचे नावही घेतलेले नाही. तसेच थेट कुठल्याही प्रकारचे नाव या प्रकरणात नाही. त्यामुळे हा थेट बदनामीचा प्रकार आहे. याविरोधात खटला दाखल होणारच. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी जर माफी मागावी, अशी मागणी अर्णब यांनी केली आहे. तसेच मला अटक झाली तर पोलीस ठाण्यात थेट रस्त्यावरून पायी चालत जाणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. 


@@AUTHORINFO_V1@@