'राज घराण्यांबद्दल बोलायची त्यांची लायकी नाही'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2020
Total Views |

nilesh rane_1  



मुंबई :
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्यावर खोचक टीका केली, ‘एक राजा बिनडोक’ अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी नाव न घेता उदयनराजेंवर प्रहार केला. त्यावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरूनच आता भाजप नेते निलेश राणे यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडले.




ट्विट करत ते म्हणतात, दोन ठिकाणी लोकसभेला उभे राहून सुद्धा जेम तेम फक्त डिपॉझिट वाचू शकले त्याची राजघराण्याबद्दल बोलण्याइतकी लायकी नाही. राजेंना राज्यसभेवर घेतलं पण प्रकाश आंबेडकरांना स्वीकृत नगरसेवक म्हणून देखील कोणताही पक्ष घेणार नाही, अशी जहरी टीका निलेश राणेंनी केली. दरम्यान, दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे असं कुठेही वाटलं नाही, एक राजा बिनडोक आहे, तर दुसरे संभाजीराजे त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे परंतु ते आरक्षणसोडून इतर मुद्द्यावर भर देतायेत. घटना कळत नसताना भाजपानं राज्यसभेवर पाठवलं कसं? हा प्रश्न उपस्थित होतो, संभाजीराजे आरक्षण सोडून इतर मुद्द्यावर जास्त भर देतात अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी संभाजीराजे आणि नाव न घेता उदयनराजेंवर टीका केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@