नितीशकुमारविरोधी प्रचारासाठी 'पीके' यांनी केले ६७ लाख खर्च !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2020
Total Views |
Bihar_1  H x W:
 


बिहार निवडणुकांची 'फेसबूक'वर रणधुमाळी!

पाटणा : प्रशांत किशोर यांनी बात बिहार की या फेसबूक पेजद्वारे नितीश कुमार यांच्याविरोधात प्रचारासाठी ६७ लाख रुपये खर्च केल्याचा अहवाल स्पष्ट झाला आहे. तुलनेने भाजप, जेडीयुतर्फे केला जाणारा फेसबूक जाहिरातींवरील खर्च कमी आहे. कोरोना काळातच बिहार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. सोशल डिस्टंसिंगमुळे पारंपारिक प्रचारावर काहीशी बंधन आली आहेत. मात्र, सोशल मीडियावर प्रचाराची रणधुमाळी उडत आहे.
 
 
पूर्वी कार्यकर्त्यांच्या जमवाजमवीसाठी त्यांच्या व्यवस्थेसाठी केला जाणारा खर्च आता सोशल प्रचारासाठी केला जात आहे. नेतेमंडळी आपल्या मतदार राजापर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया, मेसेंजर, ई-मिटींग्ज आणि अन्य डिजिटल माध्यमांचा जोरदार वापर करू लागले आहेत. बिहार विधानसभा निवडणूकीत फेसबूकवरील जाहिरातींसाठी मोठा खर्च झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशांत किशोर यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत ‘बात बिहार की’ फेसबूक पेजवर असलेला मजकूर, आशय नीतिश कुमार सरकार विरोधातील आहे.
 
 
बात बिहार की या फेसबूक पेजद्वारे सरकारच्या चुकांवर बोट ठेवणाऱ्या या पेजसाठी गेल्या आठ महिन्यांत तब्बल ६७ लाख ६२ हजार ४०५ रुपये खर्च झाल्याचा अहवाल आहे. बात बिहार की या फेसबूक पेजवरील आशय प्रमोट करणे, जाहिराती यासाठी हा निधी खर्च झाला आहे. १५ फेब्रुवारी २०२० रोजी बात बिहार की या पेजची सुरूवात करण्यात आली आहे. फेसबूकवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अशाप्रकारच्या जाहिरातींचा वापर सर्रास केला जातो. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी बिहार सरकारविरोधात सुरू केलेल्या या मोहिमेसाठी मोठी आर्थिक ताकद वापरली आहे.
 
 
गेल्या सात दिवसांत या पेजच्या प्रमोशनसाठी अॅडमिनने १ लाख १७ लाख ७६९ रुपये वापरले आहेत. जेडीयुचे पूर्वीचे फेसबूक पेज जेडीयु ऑनलाईन, असे होते. त्यानंतर त्याचे नाव बदलून जनता दल (यूनाइटेड), असे करण्यात आले आहे. या पेजने एकूण १२६ कंटेंट प्रमोट करण्यासाठी नऊ दिवसांत ९ लाख ८६ हजार ६६७ रुपये खर्च केले आहेत. ७ फेब्रुावरी २०१९ ते २९ सप्टेंबरपर्यंत जेडीयुने १० लाख १३ हजार १९ रुपये खर्च केले आहेत. २९ सप्टेंबरनंतर जेडीयुने ५ लाख ७४ हजार ८१५ रुपये खर्च केले आहेत.
 
 
भाजपच्या पेजवर ४ लाख ४७ हजारांचा खर्च
 
२७ मे २०१५ रोजी वोट फॉर बिहार हे पेज तयार करण्यात आले होते. त्याचे नाव बदलून आता बीजेपी बिहार करण्यात आले आहे. बिहार भाजपचे हे अधिकृत पेज आहे. ७ फेब्रुवारी २०१९ ते २५ सप्टेंबर २०२० पर्यंत ४ लाख ४७ हजार ७११ रुपये यावर खर्च करण्यात आला आहे. गेल्या सात दिवसांत ८२ हजार ९६५ रुपयांच्या जाहिराती करण्यात आल्या आहेत.



@@AUTHORINFO_V1@@